एक्स्प्लोर
आसाराम-मोदींचा व्हिडिओ रीट्वीट केल्याने आयसीसी अडचणीत
नरेंद्र मोदी आणि आसाराम यांच्या जुन्या गोड आठवणी तुमच्यासोबत शेअर करत आहे असा व्हिडिओ ट्वीट आयसीसीच्या हॅण्डलवरुन रिट्वीट करण्यात आला
मुंबई : अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला आसाराम बापू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना व्हिडिओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने रिट्वीट केला. ही चूक आयसीसीला चांगलीच महागात पडली आहे.
नरेंद्र मोदी आणि आसाराम यांच्या जुन्या गोड आठवणी तुमच्यासोबत शेअर करत आहे असं ट्वीट लिहित प्रतीक सिन्हा यांनी
व्हिडिओ पोस्ट केला होता. हा ट्विट आयसीसीच्या हॅण्डलवरुन रिट्वीट करण्यात आला, इतकंच नाही तर रिट्वीटमध्ये 'नारायण नारायण' अशी टिपण्णीही नोंदवण्यात आली.
खरं तर, आयसीसीच्या हँडलवरुन नेहमी क्रिकेटशी संबंधित बातम्या, फोटो किंवा व्हिडिओ ट्वीट केले जातात. मात्र काहीच संबंध नसलेलं ट्वीट आल्याने अनेक जण गोंधळून गेले.
या रिट्वीटवरुन संतापाची प्रतिक्रिया उमटल्यावर आयसीसीनं माफी मागून रीट्वीट अन्डू केला. तसंच या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंही आयसीसीनं म्हटलं आहे.Sharing some old sweet memories between @narendramodi and Asaram. pic.twitter.com/c8cveZzn0f
— Pratik Sinha (@free_thinker) April 25, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement