एक्स्प्लोर
कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगला आयसीसीची मान्यता
आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिपला आणि वन डे लीगला मान्यता दिली आहे.
ऑकलंड : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषकात ज्या प्रमाणे सर्व संघ एकत्र खेळतात, त्याच प्रमाणे आता कसोटी क्रिकेटमध्येही सर्व संघ एकत्र खेळलेले पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगसाठी मान्यता दिली आहे. ऑकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या नियमन मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून यावर विचार सुरु होता.
कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात
वन डे प्रमाणेच आता कसोटी चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीतील पहिले नऊ संघ सहा कसोटी मालिका खेळतील. तीन मालिका घरच्या मैदानावर होतील, तर तीन मालिका प्रतिस्पर्धी देशात होतील. 2019 च्या विश्वचषकानंतर कसोटी क्रिकेटमधील या नव्या पर्वाला सुरुवात होईल. प्रत्येक संघाला किमान दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते.
दरम्यान झिम्बाम्ब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी चॅम्पियनशीपमधून वगळण्यात आलं आहे.
वन डे लीगचं स्वरुप कसं असेल?
2020 पासून वन डे लीगची सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 13 संघ असतील. या लीगमध्ये खेळणारे सर्व संघ विश्वचषकाला थेट पात्र होण्यासाठी आमनेसामने असतील. 2023 च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दर दोन वर्षांनी वन डे लीग खेळवण्यात येईल. त्यानंतर दर तीन वर्षांनी लीग खेळवण्यात येईल. या लीगमध्ये प्रत्येक संघाला 8 मालिका खेळाव्या लागतील. यापैकी चार मायदेशात, तर उर्वरित चार प्रतिस्पर्धी देशात होतील. एका मालिकेत जास्तीत जास्त तीन वन डे सामने खेळवण्याची अट असेल.
भारत-पाकिस्तान मालिका होणार?
कसोटी चॅम्पियनशीप आणि वन डे लीगमधील सामने एकमेकांच्या देशात जाऊन खेळावे लागणार आहेत. मात्र पाकिस्तानने भारतात येऊन सामने खेळण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मात्र आयसीसीने यावर काही तरी पर्याय शोधण्याचं आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement