एक्स्प्लोर
पुन्हा कोच होणार का, गॅरी कर्स्टन म्हणतात...
मुंबई: अनिल कुंबळे यांच्यानंतर टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण याबाबतची चर्चा क्रिकेटविश्वात पाहायला मिळत आहेत.
अनिल कुंबळे यांचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, त्यांनी तो वाढवण्यास नकार दिला. त्यानंतर आता भारताच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक इच्छुकांचे अर्ज येत आहेत.
इच्छुकांच्या यादीत वीरेंद्र सहवागचा पहिला नंबर आहे. त्यानंतर कालच रवी शास्त्री यांनीही आपण शर्यतीत असल्याचं सांगितलं. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी हे तगडं नावही चर्चेत आहे.
असं असलं तरी टीम इंडियाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, त्या गॅरी कर्स्टन यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. पण खुद्द कर्स्टन यांनी आपण या शर्यतीत नसल्याचं म्हटलं आहे.
कोणत्याही फॉरमॅटमध्ये फुल टाईम प्रशिक्षक म्हणून सध्या तरी मी काम करु शकत नाही, असं कर्स्टन म्हणाले.
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन हे 2008 ते 2011 या काळात भारताचे प्रशिक्षक होते. त्यांच्या काळातच टीम इंडियाने 2011 सालचा विश्वचषक जिंकला होता. शिवाय त्यांच्याच काळात टीम इंडिया कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता.
गॅरी कर्स्टन यांचं भारतीय खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळेच कुंबळेंच्या नकारानंतर कर्स्टन यांचंच नाव प्रशिक्षकपदासाठी चर्चेत होतं. मात्र खुद्द कर्स्टन यांनीच त्याला नकार दिला आहे.
संबंधित बातम्या
कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहलीने मौन सोडलं!
कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला...
युवराज आणि धोनीबाबत निर्णय घेण्याची वेळ : राहुल द्रविड
कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे
अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement