एक्स्प्लोर
प्ले ऑफसाठीच्या निर्णायक सामन्यांपूर्वी पंजाबला मोठा धक्का

मुंबई : किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सला 14 धावांनी मात देऊन प्ले ऑफच्या शर्यतीत नवी चुरस भरली आहे. आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 6 सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे.
प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या पंजाबला मोठा धक्का बसला आहे. कारण पंजाबचा सलामीवीर फलंदाज हाशीम आमला आणि डेव्हिड मिलर आपल्या मायदेशात परतले आहेत.
पंजाबला उर्वरित दोन्हीही सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यातच दोन महत्वाचे खेळाडू संघात नसल्याने हा पंजाबसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आमला हा पंजाबसाठी मोठा धक्का आहे. कारण जबरदस्त फॉर्मात असलेल्या आमलाने यंदाच्या मोसमात दोन शतकं ठोकून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये संघाला आमलाची उणीव भासणार आहे.
पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्हीही सामन्यांमध्ये विजय आवश्यक आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या पंजाबसाठी उर्वरित दोन्हीही सामने निर्णायक असतील.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement

















