एक्स्प्लोर
... म्हणून निवडीनंतरही आराम देण्यात आला : हार्दिक पंड्या
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पंड्याची निवड करण्यात आली होती. मात्र नंतर त्याला आराम देण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने कळवलं.
नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी निवड होऊनही विश्रांती दिल्यानंतर हार्दिक पंड्याबाबत संभ्रमाची स्थिती होती. मात्र त्यानेच यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. आपण स्वतःच विश्रांती देण्याची मागणी केली होती, असं त्याने सांगितलं.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पंड्याची निवड करण्यात आली होती. मात्र नंतर त्याला आराम देण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने कळवलं. कोणत्या कारणासाठी आराम देण्यात आला, याबाबत काहीही सांगण्यात आलं नव्हतं.
संघ व्यवस्थापनाकडे या दौऱ्यातून विश्रांती देण्याची मागणी केली होती. कारण सतत क्रिकेट खेळल्यामुळे छोट्या-मोठ्या दुखापतीही झाल्या होत्या. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी फिट होण्यासाठी या आरामामुळे मदत होईल, असं पंड्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement