Hardik pandya : स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि शानदार यष्टीरक्षक इशान किशन यांना 28 फेब्रुवारी रोजी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा धक्का दिला. या दोघांनाही बीसीसीआयने वार्षिक करारातून बाहेर फेकले होते. मात्र, केवळ ईशान आणि श्रेयसच नाही तर चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, लेगस्पिनर युझवेंद्र चहल, उमेश यादव आणि दीपक हुडा हे खेळाडू करार यादीतून बाहेर पडले आहेत. यावर क्रिकेट चाहत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. हार्दिक पांड्या अजूनही कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये का आहे यावर काही चाहते संतापलेले दिसले. त्याचवेळी बीसीसीआयच्या यादीत इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांची निराशा झाली.


देशांतर्गत क्रिकेटपासून सतत दूर राहिल्याने बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना केंद्रीय करार न दिल्याने चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


हार्दिक पांड्याचे 'विमान' अवघ्या 24 तासात जमिनीवर!


या सर्व प्रकारानंतर हार्दिक पांड्याला सुद्धा उपरती आली आहे. त्याने आता देशांतर्गत एकदिवसीय खेळण्याची हमी बीसीसीसआयला दिली आहे. जेव्हा भारतीय संघाचा दौरा नसेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धा खेळणार असल्याचे त्याने कळवलं आहे. 






दरम्यान, इरफान पठाणने सुद्धा हार्दिक पांड्याविरुद्ध आघाडी उघडत सडकून टीका केली होती. श्रेयस अय्यरने मुंबईच्या बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भाग घेतला नव्हता. अय्यर आणि इशान किशन हे दोघेही देशांतर्गत क्रिकेट खेळले नाहीत. इशान किशन झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीही खेळला नाही.






दुसरीकडे, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांना अजूनही सी ग्रेडमध्ये स्थान मिळण्याची संधी आहे. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या हंगामात 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूचा सी ग्रेडमध्ये समावेश केला जाईल.


इतर महत्वाच्या बातम्या