मुंबई: राज्यातील भाजपच्या (BJP) 23 खासदारांचे नशीब आता लिफाप्यात बंद झालं असून लोकसभा (Lok Sabha Election) निवडणूक निरीक्षकानी आपलं मत दिल्लीला पाठवलं आहे. आता या 23 खासदारांच्या कामगिरीवर दिल्लीतील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार याचा निर्णय आता दिल्लीश्वर घेणार आहेत.
खासदारांचा अहवाल दिल्लीला
भाजपच्या खासदाराची त्याच्या मतदारसंघात कामगिरी काय आहे? त्याचा जनसंपर्क कसा आहे? त्याने किती विकासकामं केली? त्याचा पक्षाला किती फायदा झाला? यासह अनेक प्रश्नांवर पक्षाच्या निरीक्षकांनी आपला अहवाल तयार केला असून तो दिल्लीला पाठवला आहे. आता त्या अहवालावर चर्चा होणार असून त्याआधारेच पक्षाची उमेदवारी कुणाला द्यायची हे ठरणार आहे. निरीक्षकांच्या अहवालाचा आधार घेऊनच त्या खासदाराला पुन्हा संधी द्यायची की त्या ठिकाणी नवीन चेहरा द्यायचा याचाही निर्णय होणार आहे.
प्रत्येक मतदारसंघात निरीक्षकाची नियुक्ती
मिशन 45 हे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने लक्ष्य ठेवलं असून त्यासाटी भाजपने (BJP) आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. आपल्या हक्काच्या जिंकलेल्या 23 जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने निवडणूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे.
दिल्लीत आज भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप नेते बीएल संतोष आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत
कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?
भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईकधुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदेनंदरुबार- संजय भेगडे, अशोक उकेजळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेररावेर- हंसराज अहिर, संजय कुटेअहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदेजालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंहनांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुखबीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईकलातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टीसोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळमाढा- भागवत कराड, प्रसाद लाडसांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटीलनागपूर- मनोज कोटक, अमर साबळेभंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघगडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटीलवर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटीलअकोला- संभाजी पाटील, विजय चौधरीदिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकरउत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकरउत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरेउत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे
ही बातमी वाचा: