एक्स्प्लोर
हार्दिक पंड्या भविष्यातील कपिल देव : एमएसके प्रसाद
श्रीलंका दौऱ्यात अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या हार्दिक पंड्याची तुलना दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांच्याशी केली जात आहे. तो भविष्यातला कपिल देव बनू शकतो, असं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही म्हटलं आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्यामध्ये भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराऊंडर खेळाडू कपिल देव यांची बरोबरी करण्याची क्षमता आहे, असं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आक्रमक टी-20 खेळाडू म्हणून समोर आलेल्या पंड्याने काही दिवसातच वन डे आणि त्यानंतर कसोटी संघात आपलं स्थान मजबूत केलं आहे. त्याने श्रीलंका दौऱ्यात कारकीर्दीतल्या पहिल्या शतकासह अनेक विक्रमांची नोंद केली.
पंड्याने त्याच्या खेळात सातत्य ठेवलं तर निश्चितपणे काही दिवसातच त्याची तुलना दिग्गज ऑलराऊंडर कपिल देव यांच्याशी केली जाईल, असं एमएसके प्रसाद म्हणाले. कपिल देव यांनी 1994 साली निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात ऑलराऊंडर म्हणून त्यांची जागा अद्याप कुणीही भरुन काढू शकलं नाही.
भारतीय संघात स्विंगसाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाणच्या खेळातही सातत्यता दिसून आली नाही. दुखापतीमुळे आणि खराब फॉर्ममुळे अनेकदा त्याला संघातून बाहेर रहावं लागलं.
भारतीय संघासाठी ऑलराऊंडरचा शोध आता संपला आहे का, असा प्रश्न एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आला. हार्दिक पंड्याच्या रुपाने चांगला ऑलराऊंडर मिळाल्याचं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.
पंड्या एक अॅथलेटिक्स असल्यामुळे त्याचा उत्साह नेहमी कायम असतो. त्याच्या बाबतीत सकारात्मक गोष्ट म्हणजे तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही परिपूर्ण आहे, असं एमएसके प्रसाद म्हणाले.
संबंधित बातम्या :
शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम
5 चेंडूत 26 धावा, पंड्याचं कसोटीत वादळी शतक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement