एक्स्प्लोर

Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!

Hardik Pandya: मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. त्यामुळे आता पांड्याचा संताप कोणाला उद्देशून आहे याचीही चर्चा सुरु झाली आहे. 

Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्सची (MI) खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने (PBKS) काल (16 एप्रिल) गुरुवारी मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत करत दणका दिला. मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, संघाला आता "काही कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याची" आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आता पांड्याचा संताप कोणाला उद्देशून आहे याचीही चर्चा सुरु झाली आहे. 

आम्हाला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत 

सामन्यानंतर, पराभवाने निराश झालेल्या पांड्याने सांगितले की, "आम्हाला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत की नेहमीप्रमाणेच पुढे जायचे आहे, हे पाहावे लागेल. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्यावी लागतील आणि त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला नव्याने विचार करून वैयक्तिकरित्या, एक संघ म्हणून किंवा आमच्या नियोजनात कुठे कमतरता आहे, हे समजून घ्यावे लागेल."

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 60 चेंडूंमध्ये शानदार नाबाद 112 धावा केल्या, परंतु त्याचे शतक विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्याने नमन धीरसोबत (50) 68 चेंडूंमध्ये 122 धावांची भागीदारी केली, तर कर्णधार पांड्याने (14) 23 चेंडूंमध्ये 41 धावा जोडल्या. गोलंदाजीमध्ये, अर्शदीप सिंगने 22 धावांत 3 बळी घेत प्रभावी कामगिरी नोंदवली, तर शशांक सिंगने एक बळी घेतला.

पंजाब किंग्सने लक्ष्य सहज गाठलं

प्रत्युत्तरात, पंजाब किंग्सने हे लक्ष्य सहज गाठले. प्रभसिमरन सिंग (39 चेंडूंत नाबाद 80 धावा) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (35 चेंडूंत 66 धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 67 चेंडूंत 139 धावांची सामना जिंकणारी भागीदारी रचली आणि संघाला 16.3 षटकांत विजय मिळवून दिला. अल्लाह गझनफरने मुंबई इंडियन्ससाठी दोन बळी घेतले, पण ते अपुरे ठरले.

ती मुबंईची टीम होती, सेहवागनं मीठ चोळलं 

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या कामगिरीवरून टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने अत्यंत खोचक शब्दात टिप्पणी केली आहे. सेहवाग म्हणाला, मुंबई यापूर्वी तीन चार सामने हरत होती आणि कमबॅक करत होती. मात्र, ती रोहितची मुंबई होती, हार्दिक पांड्याची नाही. त्यामुळे कमबॅक कसं करायचं हा दबाव सुद्धा हार्दिकवर असल्याचे सेहवाग म्हणाला. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Hardik Pandya : टीम इंडियाला मोठा धक्का,हार्दिक पांड्या पुन्हा दुखापतग्रस्त, न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार की नाही?
टीम इंडियाला मोठा धक्का,हार्दिक पांड्या पुन्हा दुखापतग्रस्त, न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार की नाही?
Vinod Kambli Viral Video: Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Video: विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, 'मला इथं आल्यापासून..'
Asian Games 2026: 1 गुणाची आघाडी, फक्त 8 मिनिटं बाकी; भारताच्या वाघिणींनी कबड्डीचा सामना फिरवला, इराणला 37-34 ने हरवत चौथं सुवर्ण, नेमकं काय घडलं?
1 गुणाची आघाडी, फक्त 8 मिनिटं बाकी; भारताच्या वाघिणींनी कबड्डीचा सामना फिरवला, इराणला 37-34 ने हरवत चौथं सुवर्ण, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज!
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज
Embed widget