एक्स्प्लोर

French Open 2021: जोकोविचने नदालला पराभूत करून रचला इतिहास; अंतिम सामन्यात त्सिटिपासशी होणार सामना

French Open 2021: फ्रेंच ओपनच्या सेमीफायनल सामन्यात जोकोविच आणि नदाल यांच्यात जोरदार लढत झाली. यात जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने लाल मातीचा किंग नदाल याला हरवून इतिहास रचला.

French Open 2021: जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नोवाक जोकोविचने लाल मातीतील किंग राफेल नदालचं 14 वे फ्रेंच ओपन रेकॉर्ड जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. दुसर्‍या उपांत्य सामन्यात जोकोविचने चार सेटच्या सामन्यात नदालचा 3-6, 6-3, 7-6, 6-2 असा पराभव केला. जोकोविचला आता मागच्या 50 वर्षात चारही ग्रँड स्लॅम दोनपेक्षा जास्त वेळा जिंकणारा पहिला खेळाडू होण्याची संधी आहे.

फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचने लाल मातीच्या मैदानाचा बादशाह राफेल नदालचा पराभव करण्याची ही पहिली वेळ नाही. 2015 मध्येही नदालला फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सन 2016 मध्ये जोकोविच फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळविण्यात यशस्वी झाला.

जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक असलेला राफेल नदाल याअगोदर नंबर वन खेळाडू रॉजर फेडररचा विक्रम मोडण्याच्या उद्देशाने मैदानात आला होता. फेडरर आणि नदाल या दोघांनी आतापर्यंत 20-20 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. फेडररला हरवण्यासाठी आता नदालला पुढच्या फ्रेंच ओपनची वाट पाहावी लागेल.

अंतिम सामन्यात स्टेफानोस त्सिटिपास सोबत सामना होणार
नदालने जोकोविचविरुद्ध उपांत्य सामन्यात शानदार सुरुवात करत पहिला सेट 6-3 ने जिंकला होता. पण, जोकोविचने दुसर्‍या सेटमध्ये नदालला 6-3 ने पराभूत करून नेत्रदीपक पुनरागमन केले. तिसर्‍या सेटमध्ये जोकोविचने अत्यंत चुरशीच्या लढतीत 7-6 ने आघाडी मिळवली. तर चौथ्या सेटमध्ये जोकोविचने 6-2 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

चार तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की नदालविरुद्ध जिंकणे आश्चर्यकारक आहे. फ्रेंच ओपनमधील माझ्यासाठी हा सर्वात अविस्मरणीय सामना आहे. फ्रेंच ओपन जिंकून आपल्या कारकीर्दीचा 19 वा ग्रँड स्लॅम जिंकण्याची आता जोकोविचकडे मोठी संधी आहे. इतकेच नाही तर जोकोविचने फ्रेंच ओपन जिंकल्यास तो नदाल आणि फेडररपेक्षा फक्त एक पाऊल मागे असेल.

अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना 22 वर्षीय स्टेफानोस त्सिटिपासशी होईल. त्सिटिपासच्या कारकीर्दीतील हे पहिले ग्रँड स्लॅम फायनल असेल. उपांत्य सामन्यात त्याने झेवरेव्हचा 6-3, 6-3, 4-6, 6-3 ने पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या

आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
Gautam Gambhir On Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!
संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
Embed widget