एक्स्प्लोर

क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता वाडेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मुंबई : भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता वाडेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात बुधवारी (15 ऑगस्ट) रात्री अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वाडेकर 77 वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. वरळीतील राहत्या घरी आज अजित वाडेकरांचं पार्थिव सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित वाडेकर यांची दोन्ही मुलं परदेशात असल्यामुळे त्यांचे अंत्यविधी आज करण्यात येणार आहेत. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. अजित वाडेकर यांचा अल्पपरिचय अजित वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिल 1941 रोजी मुंबईत झाला. आपल्या मुलाने गणितात शिक्षण घेऊन, इंजिनिअर व्हावं, अशी अजित वाडेकरांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपलं करिअर निवडलं. क्रिकेट कारकीर्द 1958 साली त्यांनी फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये आगमन केलं, त्यानंतर 1966 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायला सुरुवात केली. 1966 ते 1974 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळले. 13 डिसेंबर 1966 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतून त्यांनी पदार्पण केलं होतं. या पहिल्या सामन्यात त्यांनी आठ धावा केल्या होत्या. तेव्हाच्या वेस्ट इंडिज संघासमोर भारताचा या सामन्यात सहा विकेट्सने पराभव झाला होता. अजित वाडेकर यांनी 37 कसोटी सामन्यांमधील 71 डावांमध्ये 2113 धावा केल्या. 143 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. या धावांमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दोन वन डे सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 73 धावा असून 67 ही सर्वोच्च खेळी आहे. ‘आक्रमक फलंदाज’ म्हणून वाडेकरांची ओळख होती. अजित वाडेकर त्यांच्या कारकीर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत. ‘सर्वोत्कृष्ट स्लिप फिल्डर’ म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परदेशात भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार म्हणजे अजित वाडेकर. शिवाय भारताचे ते पहिले वन डे कर्णधार होते. कसोटी कारकीर्द - सामने – 37 - धावा – 2113 - शतक – 1 - अर्धशतकं - 14 सन्मान भारत सरकारने अजित वाडेकर यांना 1967 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात 'अर्जुन पुरस्कारा'ने गौरवलं, तर 1972 साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवलं.

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
MS Dhoni And Rishabh Pant Video: जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget