Footballer Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) फुटबॉलसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मैदानावर त्याच्या नावावर अनेक विक्रम आहे. रोनाल्डोच्या मैदानातील विक्रमांबरोबरच सोशल मीडियावर देखील त्याच्या नावे एक नवा विक्रम दाखल झाला आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर 300 फॉलोअर्स झाले आहे. एवढे फॉलोअर्स असणारा तो जगातील  पहिला पहिला व्यक्ती ठरला आहे. WWE रॉक स्टार ड्वेन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. ख्रिस्टियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. या माध्यमातून तो पैसे देखील कमवतो. इनस्टाग्रामकडून सर्वाधित कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये रोनाल्डोचे नाव आहे. 


क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अवॉर्ड जिंकले आहेत.पोर्तुगालच्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे. रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताही टॅटू गोंदवला नाही. तो वर्षातून अनेकवेळा रक्तदान करतो. त्यामुळे त्याने ही खबरदारी घेतलीय. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 102 गोल केले आहेत. तसेच आतापर्यंत 9 वेळा हॅट्रिक केली आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू अशी ख्याती असलेला पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोने फेब्रुवारीमध्ये  36 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 


पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोनाल्डोने पाचही वेळेस म्हणजेच 2004, 2008, 2012 आणि 2016, 2021 च्या युरो कपमध्ये गोल झळकावले आहेत. पोर्तुगालच्या वतीनं सर्वाधिक 106 गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. युरो कपमध्ये सर्वाधिक वय असतानाही एका सामन्यात 2 हून अधिक गोल करण्याचा मान त्यानं मिळवला आहे.  रोनाल्डोनं सर्वाधिक 5 युरो कप खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी अनेक खेळाडू 4 वेळा युरो कपमध्ये खेळले होते. पण, रोनाल्डो या स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी होणारा पहिला खेळाडू ठरला आहे.


संबंधित बातम्या :


Cristiano Ronaldo PC : फुटबॉलर रोनाल्डोच्या दोन शब्दांनी कोका-कोलाला झटका! कंपनीला तब्बल 30 हजार कोटींचा फटका


EURO CUP 2020: क्रिस्टियानो रोनाल्डोनं रचला इतिहास, स्पर्धेत खास विक्रमांची नोंद