मुंबई : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचे भाव वाढले तर काही कंपन्याचे शेअर वाढले. आता असाच अनुभव कोका कोला कंपनीला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने (Cristiano Ronaldo) केलेल्या कृतीचा कोका कोला (Coca- Cola) कंपनीला फटका बसला आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने एका पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्या आणि या कृतीचा फटका कोका कोला कंपनीला बसला आणि कंपनीचे  30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले


नेमकं काय घडलं?


पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने सामन्याअगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याच्या टेबलवर कोका कोलाच्या दोन बाटल्या होत्या. त्याने त्या बाटल्या हटवत त्या जागी पाण्याच्या बाटल्या ठेवत आपली नाराजी व्यक्त केली. एवढच नाही पाण्याची बाटली उचलत लोकांनी कोल्ड ड्रिंक नाही तर  पाणी  पिण्याचा सल्ला दिला. झाल तर रोनाल्डोच्या या 25 सेकंदाच्या कृतीनंतर कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरवात झाली. रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोका कोलाचे अंदाजे 4 बिलियन डॉलर पर्यंत शेअर घसरले. 






मिळालेल्या माहितीनुसार, युरोपात दुपारी 3 वाजता शेअर मार्केट सुरू होते. त्यावेळी कोका कोलाच्या शेअरचा दर 56.10  डॉलर एवढा होता. अर्ध्या तासानंतर रोनाल्डोची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर लगेच कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरुवात झाली. कोका कोलाचे शेअर 55.22 डॉलर पर्यंत पोहचले. त्यानंतर कोका कोलाच्या शेअरमध्ये चढ उतार सुरूच आहे. 


कोका कोलाची बाजू


कोका कोला यूरो कपचे ऑफिशिअल स्पॉन्सर आहे. त्यामुळे स्पॉन्सर त्यांचे उत्पादन प्रत्येक कार्यक्रमात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. या घटननेनंतर कोका कोलाने आपली बाजू मांडली आहे. कोका कोलाने (Coca- Cola) म्हटले आहे की, खेळाडूंना पत्रकार परिषदेदरम्यान अनेक प्रकारची शीत पेय दिली जातात. आता हे प्रत्येक खेळाडू ठरवतो की त्याला कोणते पेय घ्यायचे किंवा कोणते नाही. 


रोनाल्डोची जगातील सर्वोत्तम फुटाबॉलपटूंपैकी एक आहे. फक्त सोशल मीडियावरच नाही तर जगात रोनाल्डोचे लाखो चाहते आहे. अशातच आपल्या लाडक्या फुटबॉलपटूने आपल्या कृतीतून दिलेला संदेश कोका कोलाला चांगलाच महगात पडला. रोनाल्डो फिट कायमच फिटनेसच्या बाबतीत संदेश देत असतो. रोनाल्डो स्वत: देखील फिट राहण्यासाठी सर्व प्रकारच्या कोल्ड ड्रिंकपासून दूर राहतो.