EURO CUP 2020: क्रिस्टियानो रोनाल्डोनं रचला इतिहास, स्पर्धेत खास विक्रमांची नोंद
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अफलातून खेळाच्या बळावर आणि त्याच्या कर्णधारपदाच्या जबाबदारी अंतर्गत पोर्तुगालच्या संघानं हंगरीचा 3 - 0 असा पराभव केला आहे. दोन्ही संघांमध्ये हाफ टाईमपर्यंत एकही गोल झाला नव्हता. यानंतर रोनाल्डोनं संघासाठी दोन गोल करत सामन्यात आघाडी मिळवून दिली. (छाया सौजन्य- instagram @cristiano)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंघासाठी सर्वात पहिला गोल 84 व्या मिनिटाला राफेल गुरेरानं केला. यानंतर पाचव्या मिनिटाच्या आतच रोनाल्डोनं दोन गोल केले. या दोन्ही गोलच्या बळावर रोनाल्डो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. (छाया सौजन्य- instagram @cristiano)
या सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर आलेल्या रोनाल्डोनं त्याच क्षणी सर्वाधिक 5 युरो कप खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी अनेक खेळाडू 4 वेळा युरो कपमध्ये खेळले होते. पण, रोनाल्डो या स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. (छाया सौजन्य- instagram @cristiano)
पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोनाल्डोने पाचही वेळेस म्हणजेच 2004, 2008, 2012 आणि 2016, 2021 च्या युरो कपमध्ये गोल झळकावले आहेत. पोर्तुगालच्या वतीनं सर्वाधिक 106 गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. (छाया सौजन्य- instagram @cristiano)
युरो कपमध्ये सर्वाधिक वय असतानाही एका सामन्यात 2 हून अधिक गोल करण्याचा मान त्यानं मिळवला आहे. हंगरीविरोधातील सामन्याच्या वेळी त्याचं वय 36 वर्षे 130 इतकं होतं. (छाया सौजन्य- instagram @cristiano)
(छाया सौजन्य- instagram @cristiano)