सातारा : गेली अनेक दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना (Maharashtra Corona Update) संसर्गाचा आलेख उतरता पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्यासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. ब्रेक द चेनच्या नवीन नियमांची घोषणा करून तीन आठवडे झाले आहेत. या तीनही आठवड्यात हा आलेख उतरता पाहायला मिळतोय. विशेषतः राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक पाहायला मिळत होती. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. या सहाही जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना पाहायला मिळतोय. तर ऑक्सिजनने व्यापलेल्या खाटांचे प्रमाणही कमी होत आहे. सहा जिल्ह्याच्या पाठोपाठ मुंबई शहर आणि उपनगरातही संसर्ग कमी होऊ लागला आहे.


Coronavirus : दिलासा! राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख उतरता


सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन (Satara Lockdown) उद्यापासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आकडेवारी कमी झाल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर हॉटेल 50 टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. 


Maharashtra Corona Cases : राज्यात सध्या 1,39,960 अॅक्टिव्ह रुग्ण, गुरुवारी 9,830 नवे कोरोनाबाधित तर 5,890 डिस्चार्ज


साताऱ्यात काय सुरु-काय बंद 



  • सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश

  • हॉटेल पन्नास टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी तर 

  • रात्री 8 पर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी

  • शेती व शेतीविषयक आस्थापने पूर्ण सुरू

  • बैठका, संस्था सभांना 50 टक्के क्षमतेने मान्यता

  • व्यायाम शाळांना, जिमला 50 टक्के क्षमतेने मान्यता

  • चित्रीकरणला परवानगी पण बायोबबलमध्येच

  • क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत

  • धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच

  •  क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत

  • धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच

  • बसेस पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

  • मास्क न घालणाऱ्या दुकानदारांवर दुकान सिलचे आदेश

  • मास्क न घालता फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड

  • लग्नाला अवघ्या 25 लोकांनाच परवानगी

  • तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी