VIRAL VIDEO : सामन्यादरम्यान खेळ आणि खेळाडूंशी संबंधित विविध घटना चर्चेत असतात. कधी सामन्यादरम्यान वाद होतात तर कधी खिलाडूवृत्तीचे फोटोही व्हायरल होते. पण पेरूमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान अशी घटना घडलेली. ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. पेरूमध्ये फुटबॉल स्पर्धेदरम्यान अशी घटना घडली जी खेळात क्वचितच पाहायला मिळते. थेट सामन्यादरम्यान एका खेळाडूने मैदानावर मूत्रविसर्जन केले. यानंतर रेफरीने लगेचच खेळाडूला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया...
फुटबॉलपटूने केले लज्जास्पद कृत्य
ही घटना कोपा पेरूमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याची आहे, ज्यात ॲटलेटिको अवाझुन आणि कॉन्टोरसिलो एफसी आमनेसामने होते. सामन्याच्या 71व्या मिनिटाला अवाझुनच्या संघाला कॉर्नर मिळाला, त्यावेळी दोन्ही संघ एकही गोल न करता बरोबरीत होते. अवझुनचा सेबॅस्टियन मुनोझ कॉर्नर घेण्यास तयार होता, पण त्यावेळी कँटोरसिलोचा गोलकिपरला छोटी दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी काही काळ सामना थांबलेला मुनोझने पाहिला. तो कॉर्नरला पुन्हा सामना चालू होण्याची वाट पाहत थांबला होता. पण तो मागे वळाला आणि भिंतीवर मूत्रविसर्जन केले.
रेफ्रीने दिले रेड-कार्ड
मुनोजला हे करताना पाहून कॉन्टोरसिलोच्या एका खेळाडूने पाहिले आणि रेफ्रींना याची माहिती दिली. रेफ्रींनी मुनेझला पाहताच तो संतापला आणि त्याला थेट रेड कार्ड दाखवले. रेड कार्ड दाखवणे म्हणजे खेळाडू तात्काळ मैदानाबाहेर. रेड कार्ड मिळाल्याने त्याच्यावर पुढील सामन्यासाठीही बंदी घातली जाऊ शकते. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.
यापूर्वीही घडली अशी घटना
सामन्यादरम्यान खेळाडू मूत्रविसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये, सॅल्फोर्ड कीपर मॅक्स क्रोकोम्बेला सामन्यादरम्यान मूत्रविसर्जन केल्याबद्दल रेड कार्ड मिळाले होते. एका वर्षापूर्वी मॅन्सफिल्ड फॉरवर्ड आदि युसूफला एका सामन्यादरम्यान स्टँडच्या मागे मूत्रविसर्जन केल्याबद्दल पाच सामन्यांसाठी दंड आणि बंदी घालण्यात आली होती.
संबंधित बातमी :
फक्त 2 चेंडूत खेळ खल्लास! 'अरे, त्याला झिम्बाब्वेविरुद्ध खेळवा...' बाबर आझम होतोय ट्रोल
IPLच्या स्टारचा झाला मोठा अपघात! मानेला चेंडू लागल्याने गंभीर जखमी; हॉस्पिटलमध्ये दाखल
सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस