Babar Azam Trolled : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो एकदम योग्य ठरला.


पाकिस्तान संघांची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 16 धावांवर संघाने आपल्या पहिल्या तीन विकेट गमावल्या. पाकिस्तानची तिसरी विकेट बाबर आझमच्या रूपाने पडली. तो शून्यावर बाद झाला. शरीफुल इस्लामने बाबरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बाबर शून्यावर आऊट झाल्यानंतर आता तो सोशल मीडियावर खुप ट्रोल होत आहे.


अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब रावळपिंडीत पाकिस्तानकडून सलामीला आले. यादरम्यान शफिक अवघ्या 2 धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच शान मसूद पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानची तिसरी विकेट बाबरच्या रूपाने पडली. 2 चेंडूंचा सामना करताना तो शून्यावर बाद झाला. बाबर आऊट झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल केले.






खरंतर बाबर आझमचे चाहते त्याची तुलना विराट कोहलीसोबत करतात. कोहली आणि बाबरची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता तो शून्यावर आऊट झाल्यामुळे चाहते त्याला ट्रोल करत आहे. कोहलीच्या एका चाहत्याने लिहिले की, "अरे त्या बाबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळवा कोणीतरी.'' या पोस्टसोबत इतरही पोस्ट शेअर केल्या आहेत.






खरं तर, बाबर कारकिर्दीत प्रथमच पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात खाते न उघडता बाद झाला. यापूर्वी सात वेळा तो शून्यावर बाद झाला होता, पण तो सर्व परदेशात. एप्रिल 2021 नंतर प्रथमच तो शून्यावर बाद झाला होता. दुसरीकडे बाबरच्या विकेटमुळे पाकिस्तानने अवघ्या 16 धावांत 3 विकेट गमावल्या. संघाचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक फक्त 2 धावा करू शकला आणि कर्णधार शान मसूदला फक्त 6 धावा करता आल्या.







संबंधित बातमी :


Jaydev Unadkat : 400 हून अधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाने घेतला मोठा निर्णय, आता 'या' देशात खेळणार क्रिकेट

IPLच्या स्टारचा झाला मोठा अपघात! मानेला चेंडू लागल्याने गंभीर जखमी; हॉस्पिटलमध्ये दाखल


सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर बक्षिसांचा वर्षाव; सासऱ्यांकडून मिळणार म्हैस


ऑलिम्पिकआधी मोडकळीस आलेले घर अन् 80 लाखांची संपत्ती; सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता अर्शद नदीमने नीरज चोप्रालाही टाकलं मागे!