Copa America 2024 Final Argentina vs Colombia: अर्जेंटिनाने (Argentina) कोपा अमेरिका 2024 च्या स्पर्धेत (Copa America 2024) विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत कोलंबियाचा पराभव करून कोपा अमेरिका ट्रॉफी जिंकली. कोपा अमेरिकेतील अर्जेंटिनाचे हे 16 वे विजेतेपद ठरले. अर्जेंटिनाचा हा कोपा अमेरिकेतील सलग दुसरा विजय होता याआधी 2021 मध्ये झालेल्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने ब्राझीलला हरवून विजेतेपद पटकावले होते.






2024 कोपा अमेरिकाचा अंतिम सामना आज (15 जुलै रोजी) भारतीय वेळेनुसार फ्लोरिडा येथील हार्ड रॉक स्टेडियमवर खेळला गेला. सामना खूपच रोमांचक झाला, कारण विजयी गोल फूट टाइममध्ये नाही तर अतिरिक्त वेळेत झाला. फूट टाईमच्या 90 मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोलचे खाते उघडता आले. अर्जेंटिनाने हा सामना 1-0 असा जिंकला. सामन्यातील एकमेव गोल 112 व्या मिनिटाला (अतिरिक्त वेळेत) झाला, जो अर्जेंटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने केला. हा त्याचा स्पर्धेतील पाचवा गोल होता, ज्यासाठी त्याला गोल्डन बूटचा किताबही देण्यात आला होता.


लिओनेल मेस्सी अर्जेंटिनासाठी संपूर्ण सामना खेळू शकला नाही-


अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी दुखापतीमुळे संपूर्ण सामना खेळू शकला नाही. सामन्याच्या 66व्या मिनिटाला मेस्सीच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. दुखापतीमुळे तो बेंचवर बसूनही रडू लागला. मात्र, संघातील इतर खेळाडूंनी मेस्सीची अनुपस्थिती जाणवू दिली नाही आणि सामना जिंकला.


उरुग्वेला मागे टाकत अर्जेंटिना स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ-


2024 मध्ये कोपा अमेरिका जिंकून, अर्जेंटिना स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला. यावेळी संघाने 16 वे विजेतेपद पटकावून उरुग्वेला मागे सोडले. या मोसमापूर्वी अर्जेंटिना आणि उरुग्वेने प्रत्येकी 15 जेतेपदे पटकावली होती. आता अर्जेंटिनाने स्वतःला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनवले आहे.


स्पेनने यूरो कपचं पटकावलं जेतेपद-


स्पेनने युरो कपच्या (Euro Cup 2024) अंतिम सामन्यात इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून चौथ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळविले. याआधी स्पेनने संघाने 1964, 2008 आणि 2012 मध्ये युरो कपचे विजेतेपदही पटकावले आहे. स्पेनने सर्वाधिक चार युरो कप जिंकत जर्मनीलाही मागे टाकले आहे. स्पेनकडून सतत इंग्लंडच्या पेनल्टी क्षेत्ररक्षणावर आक्रमण सुरु राहिले. स्पेनने दुसऱ्या हाफमधील पहिल्याच मिनिटाला गोल मिळवला. 47 व्या मिनिटाला यमालच्या पासवर निको विलियम्सने इंग्लंडच्या गोलरक्षकाला चकवून अप्रितम गोल केला. यानंतर 73 व्या मिनिटाला कोल पाल्मरने गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. परंतु 87 व्या मिनिटाला मिकेल ओयारझबालच्या भन्नाट गोलने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली.  हा गोल स्पेनचा विजय पक्का करण्यासाठी पुरेसा ठरला आणि इंग्लंड 2-1 असा फरकाने पराभूत करण्यात यश मिळवले.


संबंधित बातमी:


Euro Cup Final 2024 England vs Spain: स्पेनने यूरो कपचं पटकावलं जेतेपद, 2-1 ने मिळवला विजय; इंग्लंडचा 58 वर्षांचा दुष्काळ कायम