News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

Sergio Ramos Retirement : स्पेनचा फुटबॉलपटू सर्जिओ रामोसचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा, जड अंतःकरणाने निवृत्तीची घोषणा

Sergio Ramos Retirement : स्पेनचा फुटबॉलपटू सर्जिओ रामोसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

FOLLOW US: 
Share:

Sergio Ramos Retirement : स्पेनचा (Spain) फुटबॉलपटू सर्जिओ रामोसने (Sergio Ramos) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. संघाचे नवीन व्यवस्थापक लुईस डे ला फुएन्टे यांच्याशी झालेल्या फोन कॉलनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. स्पेनच्या विश्वचषक आणि युरो विजेत्या संघांचा भाग असलेला रामोस हा 'ला लीगा'मध्ये रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व करत होता आणि आता तो लीग 1 मध्ये पीएसजीकडून खेळतो.

जड अंतःकरणाने निवृत्तीची घोषणा करताना सर्जिओ रामोसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं आहे की, "आमच्या लाडक्या राष्ट्रीय संघाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. "आज सकाळी मला विद्यमान प्रशिक्षकांचा कॉल आला. संघातून वगळल्याची माहिती त्यांनी मला दिली."

सर्जिओ रामोस 2021 पासून संघाबाहेर

दरम्यान, सर्जिओ रामोसला माजी प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी राष्ट्रीय संघातून वगळलं होतं आणि मार्च 2021 पासून तो संघात दिसला नव्हता. त्यानंतर स्पेन संघाचे नवीन व्यवस्थापक लुईस दे ला फुएन्टे यांनीही रामोसला संघातून वगळण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती दिली, ज्यामुळे रामोसने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

2005 मध्ये स्पेनच्या राष्ट्रीय संघात पदार्पण

सर्जिओ रामोसने 2005 मध्ये स्पेनच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलं होतं. तो आपल्या देशासाठी 180 वेळा खेळला आणि 2010 मध्ये विश्वचषक आणि 2008 आणि 2012 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. परंतु युरो 2020 आणि 2022 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं. मोरोक्कोविरुद्धच्या संघाच्या धक्कादायक पराभवामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

'माझ्या क्रीडा प्रवासाचा शेवट होतोय, याचा अतिशय खेद'

"माझ्या क्रीडा प्रवासाचा शेवट होतोय, याचा मला अतिशय खेद आहे. हा प्रवास मोठा असेल आणि संघासाठी यशाची चव चाखता येईल, अशी मला आशा होती. परंतु मला नम्रपणे वाटतं की वैयक्तिक निर्णयामुळे किंवा माझी कामगिरी आमच्या राष्ट्रीय संघाच्या पात्रतेनुसार नसल्यामुळे करिअर संपुष्टात आलं, वय किंवा इतर कारणांमुळे नाही. कारण तरुण असलं असणे हा गुण किंवा दोष नाही, ती केवळ एक तात्पुरती बाब आहे ज्याचा कार्यक्षमतेशी किंवा क्षमतेशी संबंध नाही. मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे... फुटबॉलमधील परंपरा, मूल्ये, योग्यता आणि न्याय यांच्याकडे कौतुकाने आणि मत्सराने पाहतो.

दुर्दैवाने माझ्यासाठी असं होणार नाही, कारण फुटबॉल नेहमीच न्याय्य नसतो आणि फुटबॉल हा फक्त फुटबॉल नसतो. या सर्व गोष्टींद्वारे मी हे दु:ख तुमच्यासोबत शेअर करु इच्छितो, परंतु या सर्व वर्षांसाठी आणि तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी मी खूप खूप आणि खूप आभारी आहे."

Published at : 24 Feb 2023 11:31 AM (IST) Tags: football spain Sergio Ramos Sergio Ramos Retirement

आणखी महत्वाच्या बातम्या

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश

Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश

India vs Qatar: फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

India vs Qatar:  फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

IND vs AUS: टीम इंडिया, द्रविड के लिए वर्ल्डकप जितो यार! 16 वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून हरला, आता प्रशिक्षक म्हणून विजयी निरोप मिळेल?

IND vs AUS: टीम इंडिया, द्रविड के लिए वर्ल्डकप जितो यार! 16 वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून हरला, आता प्रशिक्षक म्हणून विजयी निरोप मिळेल?

Thomas Muller : युरोपियन फुटबाॅल किंग सुद्धा विराट कोहली अन् टीम इंडियाच्या प्रेमात; थेट निळी जर्सी घालून समर्थनासाठी मैदानात!

Thomas Muller : युरोपियन फुटबाॅल किंग सुद्धा विराट कोहली अन् टीम इंडियाच्या प्रेमात; थेट निळी जर्सी घालून समर्थनासाठी मैदानात!

टॉप न्यूज़

रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल