Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेचे (Fifa World Cup) रंगतदार सामने सध्या पाहायला मिळत आहेत. आज राऊंड ऑफ 16 सामन्यांचा अखेरचा दिवस असून विशेष म्हणजे रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल आज मैदानात उतरणार आहे. संपूर्ण जगाचं खासकरुन भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलेल्या मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या संघाचे सामने सर्वासाठीच एक चर्चेचा विषय आहेत. मेस्सीचा संघ उपांत्यफेरीत पोहोचला असून रोनाल्डोच्या पोर्तुगालला उपांत्यफेरी गाठण्याची संधी आज आहे. आज ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल संघाला घेऊन मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर स्वित्झर्लंड संघाचं आव्हान असणार आहे.
दोन्ही संघातील आजवरच्या सामन्यांचा विचार करता दोघांनी 10 फ्रेंडली सामने खेळले आहेत. त्यातील सहा स्वित्झर्लंडनं तर तीन पोर्तुगालनं जिंकले आहेत. एक सामना ड्रॉ देखील झाला आहे. तसंच युएफा नेशन्स लीगच्या 3 सामन्यातील दोन सामने पोर्तुगालने तर एक स्वित्झर्लंडने जिंकला आहे.
कोणत्या खेळाडूंवर असेल नजर?
सध्या जगातील सर्वात अव्वल दर्जाचा खेळाडू रोनाल्डो (Ronaldo) मैदानात असताना अर्थातच अनेकांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. पण पोर्तुगाल संघात बर्नार्डो सिल्वा (bernardo silva), ब्रुनो फर्नांडीस (bruno fernandes) या स्टार खेळाडूंवरही सर्वांची नजर असेल. तर डिफेन्समध्ये अनुभवी पेपेला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असती. स्वित्झर्लंड संघानेही यंदाच्या विश्वचषकात कमाल कामगिरी केल्यामुळे त्यांचे स्टार खेळाडू शकिरी, रॉड्रिग्ज, Xhaka यांच्यावरही अनेकांच्या नजरा टिकून असतील.
कधी, कुठे पाहाल सामना?
पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड हा बाद फेरीचा सामना आज मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी पार पडणार आहे. कतार येथील लुसेल स्टेडियम याठिकाणी हा सामना रंगणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
राऊंड ऑफ 16 च्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
Round of 16: Match- 7 | स्पेन विरुद्ध मोरोक्को | 06 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
Round of 16: Match- 8 | पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड | 07 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
हे देखील वाचा-