Fifa World Cup 2022 : कतार येथे सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) राऊंड ऑफ 16 मध्ये  क्रोएशिया आणि जपान (Croatia vs Japan) यांच्यात सामना पार पडला. हा स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामना तितकाच रोमांचक झाला. सामन्यात क्रोएशियाने जपानचा 3-1 असा पराभव केला. पण हा पराभव पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला होता. सामन्याच्या निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 गोलवरच होते. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाच्या संघाने 3 गोल केले, तर जपानला केवळ 1 गोल करता आला. ज्यामुळे सामना क्रोएशियाने जिंकत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला.


जपान आणि क्रोएशिया (JPN vs CRO) यांच्यातील हा उपउपांत्यपूर्व फेरीचा अगदी रंगतदार झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन केलं. त्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 1-1 अशा समान गोलसंख्येवर होते. बाद फेरीपासून पेनल्टी शूटआऊटचा नियम सुरू झाला आहे. कारण याआधीचे सामने ड्रॉ झाल्यास दोन्ही संघाना समान गुण येण्यात होते. पण आता बाद फेरीचे सामने असल्याने सामन्याचा निर्णय अतिरिक्त वेळ आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे घेण्यात येतो. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाच्या निकोला व्लासिक, मार्सेलो ब्रोझोविक आणि मारियो पासालिक यांनी गोल केले, त्यामुळे क्रोएशियाला तीन गोल करण्यात यश आले. त्याचवेळी जपानकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये टाकुता असानोने एकच गोल केला, इतर स्टार खेळाडूंना गोल करता न आल्याने जपानने सामना गमावला.






आता सामना ब्राझीलशी


दुसरीकडे ब्राझीलचा संघ (Brazil Football Team) फिफा विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. त्यांनी सोमवारी भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा स्टेडियम 974 येथे खेळवण्यात आलेल्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला. या विजयासह ब्राझीलनं सलग आठव्यांदा आणि एकूण 17 व्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता क्रोएशिया आणि ब्राझील सामना रंगणार आहे.


हे देखील वाचा-