Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राऊंड ऑफ 16 चे सामने संपले असून एकूण 8 संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. या 8 संघामध्ये आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होणार आहेत. एकूण 32 संघानी फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धा सुरु झाली. ज्यानंतर ग्रुप स्टेजचे मग बाद फेरीचे सामने पार पडले आणि 32 पैकी 8 संघच स्पर्धेत पुढे पोहोचले आहेत. यामध्ये ब्राझील, क्रोएशिया, पोर्तुगाल, मोरोक्को, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इंग्लंड आणि फ्रान्स या 8 संघाचा समावेश असून कोणता संघ कोणाशी, कधी भिडणार हे पाहूया...
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना | ब्राझील विरुद्ध क्रोएशिया | 09 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना | पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को | 10 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल-थुमामा स्टेडियम |
उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना | अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स | 11 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना | इंग्लंड विरुद्ध फ्रान्स | 12 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | अल बायत स्टेडियम |
कधी, कुठे पाहाल सामना?
भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
मोठ्या पडद्यावरही अनुभवता येणार फिफाचा थरार
फिफाचे रोमहर्षक सामने फुटबॉल फॅन्सना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. भारतातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लीझर लिमिटेडनने जाहीर केल्यानुसार, जगातील सर्वांत मोठी फुटबॉल स्पर्धा अर्थात फिफा वर्ल्ड कप 2022 मधील सामने भारतातील 15 शहरांतील 22 मल्टिप्लेक्सेसमधून दाखवले जाणार आहेत. फुटबॉल चाहते आता मुंबई, दिल्ली, गुरगाव, कोलकाता, पुणे, गोवा, भुवनेश्वर, जयपूर, सिलिगुरी, सुरत, इंदोर, बडोदा, धनबाद आणि त्रिसूरमधील आयनॉक्स मल्टिप्लेक्सेसमध्ये सामन्यांचे थेट प्रक्षेपण बघू शकतात.
हे देखील वाचा-