FIFA World Cup 2022: बेल्जियमचा फुटबॉल संघाचा कर्णधार ईडन हेजर्डनं (Eden Hazard) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केलीय. कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमच्या संघानं (Belgium Football Team) निराशाजनक कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत बेल्जियमच्या संघाला गट टप्प्यातून बाहेर पडावं लागलं.


फिफा विश्वचषकाच्या ग्रुप एफमध्ये बेल्जियमच्या संघाचा समावेश करण्यात आला. गट फेरीतील पहिल्या सामन्यात बेल्जियमच्या संघानं कॅनडा पराभव केला. या सामन्यात ईडन हॅजर्डला एकही गोल करता आला नाही. बेल्जियमला त्यांच्या दुसऱ्या सामन्यात मोरोक्कोकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर तिसरा आणि अखेरचा सामना बरोबरीत सुटल्यानं बेल्जियमच्या संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला. 


ट्वीट-






 


हेजर्डची उल्लेखनीय कामगिरी
हेजर्डनं 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 126 सामन्यांमध्ये 33 गोल केले आहेत. बेल्जियमचा संघ 2018च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचला होता, त्यात हेजर्डचा मोलाचा वाटा होता, जिथे बेल्जियमच्या संघाला फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला. प्लेऑफमध्ये बेल्जियमच्या संघानं प्लेऑफमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या इंग्लंडचा पराभव केला होता. 


ईडन हेजर्डची इन्स्टाग्राम पोस्ट






 


ईडन हेजर्डनं काय म्हटलंय?
"मी माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आज एक पान उलटले... तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद.  2008 पासून शेअर केलेल्या आनंदाच्या क्षणाबद्दल सर्वांचं धन्यवाद... मला तुझी आठवण येईल."


हे देखील वाचा-