Cristiano Ronaldo Transfer news : फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) वेगळा झाल्यानंतj आता सौदी अरेबियामधील क्लब अल-नासरकडून खेळणार अशी चर्चा होत होती. रोनाल्डोला कोट्यवधींची ऑफर देण्यात आली असून रोनाल्डोचाही याला होकार असल्याचं समोर येत होतं. पण रोनाल्डोने स्वत: याबाबत उत्तर देत असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचं सांगितलं आहे. पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को (POR vs MOR) सामन्यानंतर रोनाल्डोने ही माहिती दिली.


सध्या पोर्तुगाल संघाला घेऊन फिफा विश्वचषक (Fifa World Cup 2022) खेळण्यात रोनाल्डो व्यस्त आहे. पण वर्ल्डकप सुरु असतानाच रोनाल्डो त्याचा क्लब मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) बाहेर पडला. क्लब आणि रोनाल्डो यांनी मिळून हा निर्णय घेतला असून त्यानंतर सौदी क्लब अल-नासरनं रोनाल्डोला त्यांच्या क्लबकडून (Saudi Arabia) खेळण्याची ऑफ दिली असल्याचं समोर येत होतं. रिपोर्ट्सनुसार,  अल-नासरनं रोनाल्डोला तीन वर्षांच्या कराराची ऑफर दिली. त्याला 18.6 कोटी पौंड स्टर्लिंग म्हणजे सुमारे 1800 कोटी रुपयांची ऑफर मिळाली असून रोनाल्डोनेही होकार दिल्याचं समोर येत होतं. पण रोनाल्डोने याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत 'नाही! हे खरं नाही' असं म्हटलं आहे. पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को सामन्यानंतर त्याला विचारलेल्या प्रश्नांना त्यानं ही प्रतिक्रिया दिली.







रोनाल्डो-मँचेस्टर युनायटेडमध्ये वादग्रस्त वातावरण 


रोनाल्डो पीयर्स मोर्गनच्या अनसेंसर्ड टीवी शोमध्ये एरिक टेन हॅगबद्दल म्हणाला की, "माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर नाही, कारण तोही माझा आदर करत नाही. जर तुम्हाला माझ्याबद्दल आदर नसेल तर, मलाही तुमच्याबद्दल कधीही आदर वाटणार नाही.  फक्त प्रशिक्षकच नाही तर, क्लबमध्ये असे आणखी दोन-तीन लोक आहेत", असं रोनाल्डो म्हणाला. क्लबच्या वरिष्ठ क्लब एक्झिक्युटिव्हला त्याला बाहेर काढायचं आहे का? असं रोनाल्डोला विचारण्यात आलं. यावर रोनाल्डोनं उत्तर दिलं की, 'हो मला वाटतं की माझी फसवणूक झालीय आणि मला असंही वाटतं की काही लोक मला येथे पाहू इच्छित नाहीत. ही केवळ या वर्षीची गोष्ट नाही, तर मागील वर्षीही असंच काहीसं घडलं होतं. ज्यानंतर काही दिवसांनी मँचेस्टर क्लबकडून रोनाल्डो आणि त्यांच्यातील कॉन्ट्रॅक्ट तात्काळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.


हे देखील वाचा-