एक्स्प्लोर

FIH Pro League hockey: भारतीय हॉकी संघाचा शानदार विजय, अर्जेंटिनाला 4-3 नं नमवलं

FIH Pro League Hockey: भारताला काल अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. 

FIH Pro League Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एफआयएच प्रो हॉकी लीग सामन्यात अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव करून कालच्या पराभवाचा बदला घेतला. भारताला काल अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. 

युवा मिडफिल्डर हार्दिक सिंह 17व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच 20व्या मिनिटाला तरुण ड्रॅग-फ्लिकर जुगराज सिंहनेही गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-0 फरकानं आघाडीवर होता.

अर्जेंटिनानं तिसऱ्या क्वार्टरमधून पुनरागमन केलं. मिडफिल्डर आणि फॉरवर्डची भूमिका बजावणाऱ्या अनुभवी डेला टोरे निकोलसनं 40व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर गमावला नाही आणि अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. तिसरा क्वार्टर चांगल्या पद्धतीनं संपवल्यानंतर अर्जेंटिनानं चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरच्या सुरुवातीला गोल करत स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.

युवा फॉरवर्ड टॉमस डोमनं 51व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकमध्ये बदल केला. दरम्यान, 52 व्या मिनिटाला जुगराजनं आणखी एक गोल करून संघाला पुन्हा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, 56व्या मिनिटाला फॉरवर्ड फेरेरो मार्टिननं अप्रतिम गोल करत स्कोअर पुन्हा 3-3 असा बरोबरीत आणला. पण अनुभवी फॉरवर्ड मनदीप सिंहनं 60व्या आणि शेवटच्या मिनिटाला शानदार गोल करून सामना पेनल्टी शूटआऊटमधून वाचवून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

या विजयासह भारत आठ सामन्यांत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, या यादीत  नेदरलँड्सचा संघ अव्वल स्थानी आहे. अर्जेंटिना सहा सामन्यांत 11 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs DC Live Score : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस; सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय
SRH vs DC Live Updates IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस; सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय
कुणाची हॉटेलमध्ये बॉडी मिळाली, तर कुणाला गोळ्यांनी झाडलं! जेव्हा 'त्या' 4 क्रिकेटर्सच्या हत्येने संपूर्ण क्रीडाविश्व हादरलं
कुणाची हॉटेलमध्ये बॉडी मिळाली, तर कुणाला गोळ्यांनी झाडलं! जेव्हा 'त्या' 4 क्रिकेटर्सच्या हत्येने संपूर्ण क्रीडाविश्व हादरलं
Tilak Varma : ओरडला, रागावला अन्... पांड्या मैदानावर नेमकं काय काय म्हणाला? तिलक वर्मानं अखेर सगळं सांगून टाकलं
ओरडला, रागावला अन्... पांड्या मैदानावर नेमकं काय काय म्हणाला? तिलक वर्मानं अखेर सगळं सांगून टाकलं
Ayush Mhatre News : चेन्नई सुपर किंग्सचा मराठमोळा 'वाघ' IPL 2026 मधून बाहेर; धोनीच्या लाडक्या आयुष म्हात्रेची एक्झिट; प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार?
चेन्नई सुपर किंग्सचा मराठमोळा 'वाघ' IPL 2026 मधून बाहेर; धोनीच्या लाडक्या आयुष म्हात्रेची एक्झिट; प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार?

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होण्याचं संकट, जाणून घ्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं?
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Embed widget