एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : स्वित्झर्लंडचा पराभव, स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत
फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्याची स्वीडनची ही गेल्या चोवीस वर्षांमधली पहिलीच वेळ आहे.
मॉस्को : स्वीडनने स्वित्झर्लंडचा 1-0 असा पराभव करुन रशियातील 'फिफा विश्वचषका'च्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं. स्वीडनची उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्याची ही गेल्या चोवीस वर्षांमधली पहिलीच वेळ आहे.
स्वीडनच्या एमिल फोर्सबर्गनं झळकावलेला गोल या सामन्यात निर्णायक ठरला. त्याने 66 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या एका बचावपटूला आधी हुलकावणी दिली. त्यानंतर गोलरक्षक यान सॉमरला चकवून त्याने चेंडू नेमका गोलपोस्टमध्ये धाडला.
स्वीडनच्या स्वित्झर्लंडच्या विजयात एमिल फोर्सबर्गचा तो गोल निर्णायक ठरला. आता विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनचा मुकाबला कोलंबिया आणि इंग्लंडमधल्या विजयी संघाशी होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement