एक्स्प्लोर

FIFA world cup 2018: अकिनफिव्हनं पेनल्टी थोपवली आणि रशियाने इतिहास रचला

सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियाची बाद फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती. इगोर अकिनफिव्हच्या पोलादी बचावानं रशियाला आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची, म्हणजे स्पेनला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी मिळवून दिली.

मॉस्को: रशियाचा कर्णधार इगोर अकिनफिव्हनं फिफा विश्वचषकात नवा इतिहास घडवला. अकिनफिव्हनं आधी कोके आणि मग अस्पासची पेनल्टी थोपवून रशियाला स्पेनवर 4-3 असा सनसनाटी विजय मिळवून दिला. या विजयानं रशियाला तब्बल 48 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचं दार खुलं झालं. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियाची बाद फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती. इगोर अकिनफिव्हच्या पोलादी बचावानं रशियाला आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची, म्हणजे स्पेनला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी मिळवून दिली. याआधी सोव्हिएत रशियानं 1970 साली विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याआधी 1966 साली सोव्हिएत रशियानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. पण त्यानंतर गेल्या 48 वर्षांत आधीच्या सोव्हिएत रशियाला किंवा विघटनानंतरच्या रशियाला विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती. ती कमाल इगोर अकिनफिव्हच्या रशियानं करून दाखवली आहे. बेडरुममध्ये रोनाल्डोचं पोस्टर, सर्व मानधन समाजकार्याला, कोण आहे किलियान एमबापे? व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण रशियाला 2018 सालच्या फिफा विश्वचषकाचं यजमानपद बहाल करण्यात आलं, त्या वेळी जगभरातल्या एकाही फुटबॉलरसिकाला वाटलं नसावं की, रशिया उपांत्यपूर्व फेरीत धडक मारेल. कारण रशियाचा तसा इतिहास नाही. पण अकिनफिव्हच्या नेतृत्त्वाखाली रशियानं स्पेनला हरवून तो चमत्कार घडवून आणला. फिफा विश्वचषकातल्या या कामगिरीनं रशियात आता उत्साहाचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण प्रत्यक्ष विश्वचषकाआधी रशियात ही परिस्थिती नव्हती. विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या सात सामन्यांमध्ये रशियाला एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळं रशियाच्या पाठीराख्यांमध्ये आपल्या संघाच्या कामगिरीविषयी फारसा उत्साह नव्हता. पण रशियन संघानं लागोपाठ दोन विजय मिळवून, 1986 सालानंतर पहिल्यांदाच विश्वचषकाची बाद फेरी गाठली आणि त्यांच्या देशातलं सारं चित्रच पालटलं. कशी होती रशियाची विश्वचषकाच्या अ गटातली कामगिरी? रशियानं सलामीच्या साखळी सामन्यात सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा उडवला. मग रशियानं दुसऱ्या सामन्यात इजिप्तचा 3-1 असा फडशा पाडला. रशियाला तिसऱ्या सामन्यात उरुग्वेकडून 0-3 अशी मानहानी स्वीकारावी लागली. पण पहिल्या दोन विजयांनी रशियाचं बाद फेरीचं तिकीट कन्फर्म झालं होतं. रशियाचा 2018 सालच्या विश्वचषकाचा संघ हा आजवरचा त्यांचा सर्वोत्तम संघ समजला जातोय. डेनिस चेरिशेव्ह, युरी गझिन्स्की, अलेक्झांडर गोलोविन, आर्टेम झ्युबा या शिलेदारांची कामगिरी प्रभावी ठरली आहे. 27 वर्षांच्या डेनिस चेरिशेव्हनं चार सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक तीन गोल झळकावले आहेत. आर्टेम झ्युबानेही चार सामन्यांमध्ये तीन गोल नोंदवून, लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. त्याशिवाय युरी गझिन्स्की आणि अलेक्झांडर गोलोविनच्या खात्यातही एकेका गोलची नोंद झाली आहे. रशियानं बाद फेरीचं तिकीट कन्फर्म केलं, त्यावेळी प्रशिक्षक स्टॅनिस्लाव चेर्चेसोव्ह म्हणाले होते की, ही रशियाची सर्वोत्तम कामगिरी नाही, तर रशियाची सर्वोत्तम कामगिरी आपल्याला अजून पाहायला मिळायची आहे. चेर्चेसोव्ह यांचा हा दावा कर्णधार अकिनफिव्ह आणि त्याची रशियन फौज आणखी कुठवर खरा ठरवणार, हे केवळ त्यांनाच ठाऊक असावं. सोव्हिएत रशिया किंवा रशियाची फिफा विश्वचषकात खेळण्याची ही अकरावी वेळ आहे. पण आजवरच्या इतिहासात कोणत्याही रशियाला विश्वचषक पटकावायचं दूर, पण विश्वचषकाची अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. 1966 सालच्या विश्वचषकात सोव्हिएत रशियानं उपांत्य फेरीत मारलेली धडक हीच रशियाची विश्वचषकातली आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदाच्या विश्वचषकात रशियानं आजवरचा इतिहास बदलण्याचा जणू चंग बांधलेला दिसतो. त्यामुळं मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी किती सर्वोत्तम कामगिरी बजावतो, याविषयी जाणकारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. फुटबॉलच्या इतिहासात यजमान राष्ट्रानं आजवर सहावेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यात 1930 साली उरुग्वे, 1934 साली इटली, 1966 साली इंग्लंड,  1974 साली जर्मनी, तर 1978 साली अर्जेंटिनानं यजमान असताना फिफा विश्वचषक  जिंकण्याचा मान मिळवला होता. यंदा रशियाचा संघ त्यांच्या पंक्तीत बसतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संबंधित बातम्या   बेडरुममध्ये रोनाल्डोचं पोस्टर, सर्व मानधन समाजकार्याला, कोण आहे किलियान एमबापे? FIFA world cup 2018: उपउपांत्यपूर्व फेरी: हरला तो संपला, कोणाची लढत कोणाशी? 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBadlapur Case : बदलापूर घटनेतील फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Embed widget