(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Zealand vs Pakistan : फखर जमानकडून चौकार अन् षटकारांचा पाऊस! शतकी काऊंटर अटॅकने पाकिस्तान चमत्कार करणार?
Fakhar Zaman : फखर जमान बंगळूरमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. त्याने 63 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 चौकार आणि 9 षटकार आले आहेत.
Fakhar Zaman : करो व मरोच्या स्थितीत पोहोचलेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडच्या 402 धावांच्या आव्हानासमोर दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये अब्दुल्ला शफिक अवघ्या चार धावांवर बाद झाल्यानंतर फखर जमान आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कॅप्टन बाबर आझम यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर कडाडून प्रहार केला.
Hundred vs India in CT final.
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
Hundred vs New Zealand in must win game in World Cup.
Fifty vs Australia in T20 WC Semi.
Fakhar is the man for big stages in Pakistan cricket history. pic.twitter.com/IwVAlxaviQ
फखर जमान बंगळूरमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. त्याने 63 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 चौकार आणि 9 षटकार आले आहेत. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत संघाला दमदार स्थितीत नेलं आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे.
PAKISTAN ARE 10 RUNS AHEAD OF THE PAR SCORE...!!! pic.twitter.com/B81qMmtxdA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
न्युझीलंडने ठेवलेल्या 402 धावांचा पाठला करताना पाकिस्तानने 21.3 शतकात एक बाद 160 अशी भक्कम मजल मारली आहे. पाकिस्तानच्या इनिंगचा शिलेदार फखर जमान राहिला. त्याने अवघ्या 63 चेंडूमध्ये शतकी खेळी करताना पाकिस्तानला मजबूत स्थितीत नेले. दरम्यान, पावसाने व्यत्यय आणल्याने खेळ थांबला असून पाकिस्तान 10 धावांनी पुढे असल्याने आशा अजूनही कायम आहेत. दुसरीकडे बाबर आझम 47 धावांवर खेळत आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास कदाचित 10 धावा निर्णायक आहेत.
HUNDRED BY FAKHAR ZAMAN IN 63 BALLS...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
What a stupendous century by Fakhar, he's single-handedly keeping Pakistan in the game. pic.twitter.com/bypE7FENGz
डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 21.3 षटकामध्ये 150 धावा आवश्यक होत्या. मात्र, पाकिस्तानने एक बाद 160 अशी मजल मारल्याने ते 10 धावांनी पुढे आहेत. त्यामुळे एकंदरीत सामन्याच्या निकालावर परिणाम झाल्यास हीच परिस्थिती पाकिस्तानसाठी निर्णायक ठरु शकते. त्यामुळे आता पुन्हा पाऊस थांबण्याकडे दोन्ही संघाचे लक्ष असेल.
Fakhar Zaman registered the fastest century as a Pakistani in World Cup history. pic.twitter.com/fAWiL26SJd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
न्यूझीलंडची वनडे इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
दरम्यान, आजच्या सामन्यातील 401 ही न्यूझीलंडच्या वनडे इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2008 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध 50 षटकांत 2 बाद 402 धावा केल्या होत्या. आज पाकिस्तानविरुद्ध 50 षटकांत 6 गडी गमावून 401 धावा केल्या. तर 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध 398 धावा केल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या