एक्स्प्लोर

ईशांत, बुमरा, जाडेजाची वेसण, दिवसअखेर इंग्लंडच्या 7 बाद 198 धावा

इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली.

लंडन: भारताच्या जसप्रीत बुमरानं इंग्लंडच्या अॅलिस्टर कूक आणि ज्यो रुटला एकाच षटकात माघारी धाडून ओव्हलच्या पाचव्या कसोटीला कलाटणी दिली. भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली. भारताकडून ईशांत शर्मानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडच्या डावात अॅलिस्टर कूकनं कीटन जेनिंग्सच्या साथीनं सलामीला 60 आणि मोईन अलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं इंग्लंडला 63 षटकांत 133 धावा जमवता आल्या होत्या. त्याच धावसंख्येवर बुमरानं कूक आणि रूटला माघारी धाडून खेळाची सूत्रं टीम इंडियाच्या हाती आणून दिली. त्यामुळं पुढच्या 27 षटकांत इंग्लंडनं अवघ्या 65 धावांत सहा विकेट्स गमावल्या. 'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न   या सामन्यात ज्यो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय कूक-जेनिंग्सने सार्थ ठरवला. जेनिंग 23 धावा करुन माघारी परतल्यानंतर, अखेरचा सामना खेळणाऱ्या कूकने खेळाची सूत्रं हाती घेतली. कूक-मोईन अलीने इंग्लंडला भक्कम स्थितीत पोहोचवलं. मात्र चहापानानंतर बूमराने कूकला त्रिफळाचीत केलं आणि इंग्लंडची घसरगुंडी सुरु झाली. कूक बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी कर्णधार ज्यो रुट आला. मात्र त्याचा जम बसण्यापूर्वीच बुमराने त्याला पायचीत करुन, भोपळाही फोडू दिलं नाही. तीच परिस्थिती जॉनी बेअर्स्टोची झाली. त्याला ईशांत शर्माने विकेटकीपर ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. मग बेन स्टोक्सचा अडथळा रवींद्र जाडेजाने दूर केला. स्टोक्स केवळ 11 धावा करुन तंबूत परतला. एका बाजूने फलंदाज माघारी परतत असताना, दुसऱ्या बाजूला प्रमोशन मिळालेला मोईन अली उभा होता. मात्र नंतर तोही अडखळला. ईशांत शर्माने मोईन अलीला 50 धावांवर बाद केलं. त्यानंतर संपूर्ण कसोटीत टीम इंडियाची डोकेदुखी ठरलेल्या सॅम करनला ईशांत शर्मानेच आल्या पावली माघारी धाडलं.  सॅम करन बाद झाला त्यावेळी इंग्लंडची अवस्था 7 बाद 181 अशी होती. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जोस बटलर 11, तर आदिल रशीद 4 धावांवर खेळत आहे. संबंधित बातम्या 'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न   पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण   अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च! 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget