एक्स्प्लोर
वनडेत इंग्लंडचा धावांचा विश्वविक्रम, पाकविरुद्ध 444 धावा!
नॉटिंगहॅम: इंग्लंडनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा नवा विश्वविक्रम रचला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या नॉटिंगहॅम वनडेत इंग्लंडनं 50 षटकांत तीन बाद 444 धावांची मजल मारुन या विश्वविक्रमाची नोंद केली.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा याआधीचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेनं नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात 9 बाद 443 धावांचा विश्वविक्रम रचला होता.
PHOTO: वनडेत 400 पेक्षा अधिक धावा करणारे टॉप 10 संघ
इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सनं नॉटिंगहॅमला 171 धावांची खेळी करुन आपल्या संघाला नवा विश्वविक्रम रचून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
हेल्सशिवाय जो रुटनं 85 आणि बटलरनं 90 धावांची तुफानी खेळी केली. तर कर्णधार इऑन मॉर्गननं 53 धावांची धडाकेबाज खेळी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement