एक्स्प्लोर
पहिल्या वनडेत इंग्लंडचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय
हेडिंग्ले (इंग्लंड): कर्णधार इऑन मॉर्गनच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या वन डेत दक्षिण आफ्रिकेवर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना लीड्समधल्या हेडिंग्ले येथे दिवसरात्र खेळवण्यात आला. इंग्लंडनं हा सामना जिंकून, तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या या विजयानं इंग्लंडचं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मनोबल उंचावलं आहे. या सामन्यात अॅलेक्स हेल्सनं 61, ज्यो रूटनं 37, इऑन मॉर्गननं 107, बेन स्टोक्सनं 25 आणि मोईन अलीनं नाबाद 77 धावांची खेळी करून इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 339 धावांची मजल मारून दिली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला आणि फॅफ ड्यू प्लेसीनं दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचून 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची हिंमत दाखवली. पण त्यानंतर इंग्लंडच्या ख्रिस वोक्सनं चार, तर आदिल रशीद आणि मोईन अलीनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेला 267 धावांत गुंडाळलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement