एक्स्प्लोर

Eng vs India : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर

India vs England: इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर आजपासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. या दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

India vs England: पावसामुळं इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर आजपासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले आहेत. इंग्लंडचे दोन वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे सामन्यातून बाहेर झाले आहेत. जेम्स अँडरसनच्या जागी क्रेग ओवरटन तर ब्रॉडच्या जागी साकिब महमूद अंतिम अकरामध्ये असतील अशी शक्यता आहे.  सोबतच इंग्लंडच्या संघात युवा ओपनर हसीब हमीदचं पुनरागमन होऊ शकतं तसंत अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला देखील अंतिम अकरा मध्ये स्थान मिळू शकतं. 

इंग्लंडच्या 24 वर्षीय हसीब हमीदने 2016 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं. यात पहिल्या टेस्टमध्ये त्यानं शानदार 82 धावांची खेळीही केली होती. त्या मालिकेनंतर त्याला संघात जागा मिळाली नव्हती.  पहिल्या कसोटीत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ली दोघेही चांगली खेळी करु शकले नाहीत. त्यामुळं दोघांपैकी एकाला डच्चू मिळू शकतो. सोबतच बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्सच्या अनुपस्थितीत मोईन अलीला संघात स्थान मिळू शकतं. भारताकडून देखील आर अश्विनला दुसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 
 

इंग्लंडविरुद्धच्य पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज होती. टीम इंडियाकडे 9 विकेट्स शिल्लक होत्या मात्र शेवटच्या दिवशीचा खेळ पावसामुळं होऊच शकला नाही. पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला होता.  तर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 52 धावा केल्या होत्या.  इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.  
  
पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या होत्या.  त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget