एक्स्प्लोर
Advertisement
मोहम्मद अझरुद्दीनचा HCA अध्यक्षपदासाठीचा अर्ज रद्द
हैदराबाद : टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.
अझहरवर बीसीसीआयने घातलेली आजीवन बंदी उठवण्यात आली आहे की नाही, याविषयीचं स्पष्टीकरण त्याला देता आलं नाही. म्हणूनच त्याचा अर्ज रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2000 सालच्या मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने अझरुद्दीनवर आजीवन बंदी घातली होती. 2012 साली आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा आदेश दिला, पण बीसीसीआयने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.
लोढा समितीच्या शिफारशींनुसार अर्शद अयुब यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण एचसीएच्या अझरुद्दीनने नियमांनुसार कार्यकारिणीत याआधी कुठलंच पद सांभाळलेलं नाही. त्यामुळे त्याला ही निवडणूक लढवता येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement