एक्स्प्लोर
ब्राव्होचा धोनीसमोर बेभान डान्स, हरभजनचीही साथ
फाफ डू प्लेसीस चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयाचा खरा हिरो ठरला. सलामीला आलेल्या प्लेसीसने अखेरपर्यंत टिकून खेळी करत चेन्नईला विजय मिळवून दिला.
मुंबई : आम्हाला चॅम्पियन का म्हटलं जातं, हे चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पुन्हा एकदा दाखवून दिलं. मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर दोन विकेट्स राखून मात करत यंदाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली.
फाफ डू प्लेसीस चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयाचा खरा हिरो ठरला. सलामीला आलेल्या प्लेसीसने अखेरपर्यंत टिकून खेळी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. त्याने 42 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने नाबाद 67 धावा केल्या.
चेन्नईने या विजयासोबतच आपल्या नऊ वर्षांच्या इतिहासात सात वेळा फायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम केला. हैदराबादचा पराभव केल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. प्लेसिसने विजयी षटकार ठोकताच सर्व खेळाडू मैदानात धावत आले.
टीमचा पॉप परफॉर्मर ड्वेन ब्राव्होने ड्रेसिंग रुममध्येही सेलिब्रेशन केलं आणि सर्वांना या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करुन घेतलं. त्याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीसमोर डान्स केला. धोनी ब्राव्होकडे पाहून केवळ हसत राहिला. एवढंच नाही, तर हरभजन सिंहनेही ब्राव्होला साथ दिली. इतर खेळाडूंनीही दोघांना जॉईन केलं.Champion's groovy tribute to #Thala after getting through to the #Finale! #WhistlePodu #yellove 🦁💛 @msdhoni @DJBravo47 @harbhajan_singh @lakshuakku pic.twitter.com/W9wsa23FcH
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 22, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement