एक्स्प्लोर
Advertisement
खेळाचा आनंद घ्या, यश आपोआप मागे येईल- धोनी
बंगळुरुः क्रिकेट खेळताना कसल्याही तणावाशिवाय खेळाचा आनंद घेणं गरजेचं आहे, यश तुमच्या आपोआप मागे येतं, अशा शब्दात वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी युवा खेळाडूंना महत्वाचा संदेश दिला.
भारतीय संघाचा कसोटीत गेल्या दोन-तीन वर्षांपासून युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न आहे. भारतीय संघ युवा खेळाडूंच्या कार्यक्षमतेमुळे चांगली प्रगती करत आहे, असं धोनीने सांगितलं. धोनीने खेळाडूंना 45 मिनीटे प्रेरित करणारं मार्गदर्शन केलं.
कसोटीमध्ये भारताकडे सर्वच चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यामुळे आगामी काळ भारतासाठी महत्वाचा असणार आहे. सर्व खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहेत. मात्र 17 कसोटींमध्ये सर्वांचा चांगला ग्रुप तयार होईल. सर्वांनी कसल्याही तणावाशिवाय खेळाचा आनंद घ्यायचा, यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही, असा प्रेरणादायी संदेश धोनीने खेळाडूंना दिला.
पाहा धोनीचं भाषणः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
बीड
Advertisement