एक्स्प्लोर

धोनी कोलंबोच्या मैदानात उतरताच सामन्यांचं त्रिशतक पूर्ण करणार!

भारत आणि श्रीलंका संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणारी चौथी वन डे ही धोनीच्या कारकीर्दीतली तीनशेवी वन डे आहे.

कोलंबो : भारत आणि श्रीलंका संघांमधला चौथा वन डे सामना उद्या (गुरुवार) कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला हा तीनशेवा वन डे सामना असेल. त्यामुळे या सामन्यात धोनी कशी कामगिरी बजावतो, ही टीम इंडियाच्या चाहत्यांची मुख्य उत्सुकता राहिल. कॅण्डीच्या लागोपाठ दोन वन डे सामन्यांमध्ये मॅचफिनिशरची भूमिका बजावणारा टीम इंडियाचा विघ्नहर्ता महेंद्रसिंग धोनी आता 'क्लब थ्री हण्ड्रेड'मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय. भारत आणि श्रीलंका संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणारी चौथी वन डे ही धोनीच्या कारकीर्दीतली तीनशेवी वन डे आहे. वन डे क्रिकेटच्या इतिहासात एक सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी धोनीची ओळख आहेच. पण कोलंबोत आणखी एक जबरदस्त कामगिरी बजावून वन डे सामन्यांचं त्रिशतक साजरं करण्याचा धोनीचा इरादा राहिल. भारताच्या वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सामन्यांचं त्रिशतक साजरं करणारा धोनी हा सहावा शिलेदार ठरेल. याआधी सचिन तेंडुलकरने 463, राहुल द्रविडने 344, मोहम्मद अझरुद्दिनने 334, सौरव गांगुलीने 311 आणि युवराज सिंहने 304 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या रथीमहारथींच्या 'क्लब थ्री हण्ड्रेड'मध्ये आता धोनीची एण्ट्री होईल. धोनीमधल्या आक्रमकतेची धग ही वाढत्या वयानुसार कमी झाली असली तरी त्याच्यामधला मॅचफिनिशर अजूनही जागता असल्याचं कॅण्डीतल्या लागोपाठ दोन्ही वन डे सामन्यांमध्ये दिसून आलं. टीम इंडिया संकटात सापडलेली असताना त्याने दुसऱ्या वन डेत नाबाद 45 आणि तिसऱ्या वन डेत नाबाद 67 धावांची खेळी उभारून आपली उपयुक्तता सिद्ध केली. विशेष म्हणजे या दोन्ही खेळींदरम्यान त्याने अनुक्रमे भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्माच्या हाती सूत्रं देऊन स्वतः दुय्यम भूमिका स्वीकारली. तोच धोनी कारकीर्दीतल्या तीनशेव्या वन डेत कशी कामगिरी बजावतो, ही टीम इंडियाच्या चाहत्यांची उत्सुकता असेल. कॅण्डीच्या दोन्ही वन डे सामन्यांमध्ये धोनीच्या कामगिरीइतकीच अधोरेखित झालेली दुसरी बाब म्हणजे भारताच्या मधल्या फळीचं अकिला धनंजयसमोरचं अपयश. लोकेश राहुल हा मूळचा सलामीचा फलंदाज असल्याचं सांगून चौथ्या क्रमांकावर त्याच्या निराशाजनक कामगिरीचा बचाव करण्यात येत आहे. पण केदार जाधवच्या अपयशाबाबत प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे. अर्थात, केदारचा पर्यायी ऑफ स्पिनर म्हणून होणारा वापर, त्याला वाचवूही शकतो. पण पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने घेतलेली 3-0 अशी विजयी आघाडी पाहता, चौथ्या आणि पाचव्या वन डेसाठी भारतीय संघात मोठ्या बदलांची शक्यता आहे.  कारण अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूरसारखे खेळाडू अजून बसून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG 2nd T20I Live Streaming : फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
Women Asia Cup 2026 Prize Money : मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Afg 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते; CM फडणवीसांनी सांगितला भाषेचा अभिमान
जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते; CM फडणवीसांनी सांगितला भाषेचा अभिमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Embed widget