एक्स्प्लोर
पुणे कसोटी जिंकून देणाऱ्या स्टीव्ह ओ'कीफला विश्रांती?

धर्मशाला: ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यातली पुण्याची पहिली कसोटी जिंकून देणारा डावखुरा स्पिनर स्टीव्ह ओ'कीफला धर्मशालाच्या चौथ्या कसोटीसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. धर्मशालाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानण्यात येते. त्यामुळं चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात स्टीव्ह ओ'कीफऐवजी वेगवान गोलंदाज जॅकसन बर्डचा समावेश करण्यात येईल. स्टीव्ह ओ'कीफनं पुण्याच्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून, भारताच्या बारा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पण बंगळुरू आणि रांची कसोटीत फिरकी गोलंदाजांना फारशा अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर ओ'कीफ मोठं यश मिळवू शकला नाही. त्यामुळं ओ'कीफला विकेट्स काढण्यासाठी अनुकूल खेळपट्टीची गरज असते, यावर शिक्कामोर्तब झालं. त्याउलट नॅथन लायन मात्र कोणत्याही खेळपट्टीवर चेंडू वळवू शकतो किंवा त्यातून बाऊन्स मिळवू शकतो. त्यामुळं चौथ्या कसोटीसाठी जॅकसन बर्डला संधी देण्यासाठी स्टीव्ह ओ'कीफला वगळण्यात येईल, हे निश्चित आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















