Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंची चमक पाहायला मिळाली. कॉमनवेल्थ बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) आज श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेचा (Niluka Karunaratne) पराभव केलाय. श्रीलंकाविरुद्ध  21-18 21-5 असा विजय मिळवत भारतानं बॅडमिंटन ग्रुपमध्ये 2-0 अशी आघाडी घेतलीय. 


कॉमनवेल्थ बॅडमिंटन पुरूष एकेरी स्पर्धेत लक्ष्य सेननं धडाकेबाज कामगिरी केली. श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये लक्ष्य सेननं 21-18 असा विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही लक्ष्य सेननं आक्रमक खेळी करत 12-2 च्या फरकानं दुसरा सेटही आपल्या नाववर नोंदवला.



बॅडमिंटन मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताची विजयी सुरुवात
बी सुमित रेड्डी आणि मचिमंदा पोनप्पा या जोडीने नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे मिश्र दुहेरी गटात मुहम्मद इरफान सईद भाटी आणि गझला सिद्दिकी यांचा 21-9 21-12 असा सहज विजय मिळवून सुरुवात केली.


भारतीय संघाने टेबल टेनिसमध्ये सलग दुसरा सामना जिंकला
भारतीय महिला संघाची टेबल टेनिसमध्ये चांगली कामगिरी सुरूच आहे. महिला संघाने सलग तिसरा सामना जिंकून गयानाचा 3-0 अशा फरकाने पराभव केला आहे. यासह भारतीय महिला संघाने त्यांच्या गटात पहिले स्थान पटकावले आहे.


मीराबाई चानूकडून पदकाची अपेक्षा
टोकियो ऑलिम्पिक-2022 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणारी मीराबाई चानूकडून बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी ती दुसरी खेळाडू महिला खेळाडू आहे. मीराबाई चानू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील तिचा पहिला सामना आज खेळणार आहे. 


हे देखील वाचा-