ICC T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात टी-20 विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषकात दमदार कामगिरी करून विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. मात्र, या विश्वचषकापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलनं (Parthiv Patel) भारताचा अनुभवी फिरकीपटूबाबत मोठ वक्तव्य केलंय. आगामी टी-20 विश्वचषकात आर अश्विनला (Ravichandran Ashwin) भारतीय संघात स्थान मिळवणं कठीण असल्याचं पार्थिव पटेलनं म्हटलंय. अश्विनच्या तुलनेत भारताकडं युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांसारखे उत्तर पर्याय असल्याचंही त्यानं म्हटलंय.


पार्थिव पटेल काय म्हणाला?
क्रिकबझशी बोलताना पार्थिव पटेल म्हणाला की, "माझ्या मते भारतीय संघ त्यांच्या पुढच्या सामन्यात उतरेल तर, अश्विनऐवजी रवी विश्नोईला संधी दिली जाईल. एवढेच नव्हेतर, आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवणं अश्विनसाठी कठीण असेल.  त्याच्याऐवजी कुलदीप यादव, रवि बिश्नोई आणि युजवेंद्र चहलला भारतीय संघात पाहायला आवडेल. रिस्ट स्पिनर मधल्या षटकात गोलंदाजीसाठी उत्तम पर्यात आहेत. कारण, अश्विन अशी कामगिरी करण्यास अपयशी ठरलाय."


वेस्ट इंडीजविरुद्ध भारताच्या टी-20 संघात आर अश्विनची निवड
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलंय. तर, युजवेंद्र चहला विश्रांती देण्यात आलीय. विंडीज दौऱ्यात भारताच्या टी-20 संघात रवींद्र जडेजा, आर अश्विन, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांसारख्या फिरकीपटूंचे अनेक पर्याय आहेत. पहिल्या टी-20 मध्ये भारताने जडेजा, बिश्नोई आणि अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. तिन्ही फिरकीपटूंनी भारतासाठी चांगली कामगिरी केली.


पहिल्या टी-20 सामन्यात फिरकीपटूंची कमाल
वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आर अश्विननं दमदार कामगिरी केली. या सामन्यात त्यानं चार षटकात 22 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. त्यानं वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायरला आपल्या जाळ्यात अडकवलं. तर, रवी बिश्नोईनंही दोन आणि रवींद्र जाडेजानं एक विकेट्स घेतली. या सामन्यात भारतानं 68 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. 


हे देखील वाचा-