Deepak Chahar: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघासाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चहरनं (Deepak Chahar) दुखापतीवर मात केली असून तो पुन्हा मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय. भारताचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) शुक्रवारी ट्विटरद्वारे दीपक चहरच्या तंदुरूस्तीबाबत माहिती दिलीय. दुखापतीमुळं दीपक चहर गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळला नाहीये. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी दीपक चहरचं तंदुरुस्त होणं, भारतीय संघासाठी चांगली गोष्ट ठरू शकते. 


दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून दीपक चहर क्रिकेटपासून दूर आहे. दीपक चहरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ज्यामुळं त्याला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागलं होतं. आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला  14 कोटी रुपयांना विकत घेतले होते. परंतु, दुखापतीमुळं त्याला चेन्नईच्या संघासाठी एकही सामना खेळता आला नव्हता. ज्याचा परिणाम चेन्नईच्या संघानं भोगलाय.


अमित मिश्राचं ट्वीट- 



अमित मिश्रा काय म्हणाला?
अमित मिश्राच्या ट्विटर पोस्टनुसार, वेगवान गोलंदाजानं पुन्हा तंदुरुस्ती मिळवली असून लवकरच तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यानचा एक फोटो शेअर करत मिश्रा यांनी लिहिले आहे की, “सीएसकेच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. तो तंदुरुस्त आहे आणि लवकरच टीम इंडिया आणि सीएसकेकडून खेळण्यासाठीसज्ज होईल. दीपक चहरला शुभेच्छा!"


आयपीएल 2022 मध्ये चेन्नईची निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं रवींद्र जाडेजाकडं चेन्नईच्या संघाचं नेतृत्व सोपवलं. परंतु, कर्णधार म्हणून रवींद्र जाडेजाला मैदानावर छाप सोडता आली नाही. ज्यामुळं रवींद्र जाडेजानं कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा धोनीकडं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. या हंगामात चेन्नईच्या संघाला 14 पैकी चार सामन्यात विजय मिळवता आलाय. ही चेन्नईच्या संघाची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी ठरलीय.


हे देखील वाचा-