एक्स्प्लोर

CWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकं

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत जितू रायने 235.1 गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

सिडनी : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्ण घोडदौड सुरुच आहे. महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात भारताला दुहेरी यश मिळालं. मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावलं. मेहुली आणि सिंगापूरच्या मार्टिना वेलोसो यांनी अंतिम फेरीत 247.2 अशा सारख्याच गुणांची कमाई केली होती. मात्र शूट ऑफमध्ये मार्टिनाने बाजी मारुन सुवर्ण पटकावलं. अपूर्वीने 225.3 गुण मिळवून कांस्य मिळवलं. त्याआधी, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक पटकावलं, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळालं. जितूने 235.1 गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 214.3 गुण मिळवणाऱ्या ओम मिथरवालने कांस्य पटकावलं. ऑस्ट्रेलियाच्या कॅरी बेलला रौप्य पदक मिळवलं. नेपाळमध्ये जन्म झालेल्या जितूने वयाच्या 20 व्या वर्षी भारतीय सैन्यात प्रवेश केला. मात्र त्याचं नशिब त्याला नेमबाजीच्या खेळात घेऊन आलं. जगभरात पिस्टलकिंग अशी ख्याती असलेल्या जितूने नेमबाजीत अनेक पदकं जिंकली आहेत. पाचव्या दिवसाची सुरुवात वेटलिफ्टींगमधील रौप्यपदकाने झाली. भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंग याने 105 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. नेमबाजीत दोन स्पर्धांमध्ये भारताला दुहेरी यश मिळालं. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक, तर ओम मिथरवाल याने कांस्यपदक मिळवलं. तसंच महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात मेहुली घोषने रौप्य, तर अपूर्वी चंदेलाने कांस्यपदक पटकावलं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 17 पदकांची कमाई केली आहे.  भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकाची कमाई केली आहे. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक. संबंधित बातम्या :
CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’
CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य
CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण
CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण
CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक
CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण
CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण
GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
Waman Mhatre Badlapur Nagarparishad: बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी
बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी
Nagpur News : भाजपचा प्रचार करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे अपहरण करून मारहाण; नागपूरच्या कळमेश्वरनगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
भाजपचा प्रचार करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे अपहरण करून मारहाण; नागपूरच्या कळमेश्वरनगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Embed widget