एक्स्प्लोर
CSK vs RR IPL 2020: आजचा सामना चेन्नई आणि राजस्थानसाठी 'करो या मरो'; या खेळाडूंवर भिस्त
CSK vs RR IPL 2020: आयपीएलच्या या मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. शेवटच्या वेळी राजस्थानने चेन्नईला 16 धावांनी पराभूत केले होते.
CSK vs RR IPL 2020: आयपीएलमध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून अबू धाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर मोसमातील 37 वा सामना खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत या मोसमातील दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नई आणि राजस्थानने आतापर्यंत 9-9 सामने खेळले असून या दोन्ही संघांना अवघ्या 3-3 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सातव्या तर राजस्थान आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचणे फार कठीण जाईल. दोन्ही संघांसाठी हा सामना म्हणजे करो या मरो अशी परिस्थिती आहे.
चेन्नई हिशोब चुकता करणार का?
आयपीएलच्या या मोसमातील दोन संघांमधील हा दुसरा सामना आहे. शेवटच्या वेळी शारजामध्ये दोन्ही संघ आमनेसामने होते, त्यामध्ये राजस्थानने चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला होता. अबू धाबीमध्ये चेन्नईचा संघ राजस्थानचा हिशोब चुकता करण्यासाठी मैदानावर उतरेल.
IPL 2020 : मैदानावर उतरताच धोनी इतिहास रचणार; अशी कामगिरी करणारा सीएसकेमधील पहिला खेळाडू
या 3 खेळाडूंवर संघाची मदार
फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन चेन्नईकडून चांगल्या फॉर्मात आहेत. आतापर्यंत या फलंदाजांनी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. डु प्लेसिसने 9 सामन्यात 365 धावा केल्या आहेत. तर गेल्या 9 सामन्यात वॉटसनने 277 धावा केल्या आहेत. अंबाती रायुडू तिसर्या क्रमांकावर आहे. रायडूच्या बॅटने आतापर्यंत 237 धावांचे योगदान दिले आहे. या खेळाडूंनी राजस्थानविरुद्ध फलंदाजी केली तर संघ मोठी धावसंख्या उभारू शकेल.
राजस्थानचे हे खेळाडू चमत्कार करू शकतात
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर संजू सॅमसनने आतापर्यंत सर्वाधिक 236 धावा केल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर राहुल तेवतिया आहे, ज्याने या मोसमात आतापर्यंत 222 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 220 धावाांसह तिसर्या क्रमांकावर आहे. बेन स्टोक्सचा संघात पुनरागमन झाल्याने फलंदाजीचा क्रमही बळकट झाला आहे. त्याचबरोबर संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने शानदार कामगिरी करत आतापर्यंत 12 बळी टिपले आहेत. हे सर्व खेळाडू चेन्नईसाठी अडचणीचे ठरू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement