एक्स्प्लोर

Cristiano Ronaldo : "ख्रिस्टियानो रोनाल्डो 'मुर्ख' माणूस", रिअल माद्रिदच्या अध्यक्षांनी ऑडियो क्लिप व्हायरल

पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोनाल्डोने पाचही वेळेस म्हणजेच 2004, 2008, 2012 आणि 2016, 2021 च्या युरो कपमध्ये गोल झळकावले आहेत.

स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मुर्ख आहे, असं रिअल मॅद्रिद क्लबचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी म्हटलं आहे. त्यांचे काही ऑडिओ टेप सध्या व्हायरल होत आहेत. ऑडिओ टेपमध्ये पेरेज क्लबचा माजी स्ट्रायकर ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि मॅनेजर जोस मॉरिन्हो यांची खिल्ली उडवताना ऐकायला मिळत आहे. डेली मेलच्या वृत्तनुसार, नवीन ऑडिओमध्ये पेरेझने रोनाल्डोला एक मूर्ख आणि आजारी माणूस असं म्हणत आहे.

ऑडिओ क्लिपनुसार पुढे पेरेझ म्हणतात की,  मॉरिन्होला खुह अहंकार आहे. हा नवीन ऑडिओ 2012 च्या चर्चेचा आहे. रोनाल्डो आणि मॉरिन्हो यांच्यावरील चर्चेचा खुलासा एल कन्फिडेंशियलने केला आहे. ऑडिओमध्ये पेरेझ रोनाल्डोबद्दल म्हणतात की, तो (रोनाल्डो) वेडा आहे. हा माणूस एक मूर्ख, आजारी माणूस आहे. आपल्याला वाटेल की हा सामान्य आहे, परंतु तो सामान्य नाही. पेरेझ ऑडिओमध्ये पुढे म्हणतात की, जोस मॉरिन्हो एक मूर्ख आहे. असे नाही की त्याला खेळायचे नाही. तो थोडा विचित्र आहे. तो लायसन्सशिवाय गाडी चालवतो. 

रोनाल्डोने 2009 मॅन्चेस्टर युनायटेडतून रियल माद्रिदमध्ये 80 मिलियन पाऊंड या रेकॉर्ड करारासह प्रवेश केला होता. त्यानंतर तो क्लबचा आजवरचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. एवढेच नव्हे तर त्याने रियल मद्रिदला चॅम्पियन्स लीगची चार विजेतेपदं जिंकण्यासही मदत केली. रोनाल्डोने माद्रिदमध्ये असताना अनेक मोठे पुरस्कारही जिंकले होते.

Cristiano Ronaldo PC : फुटबॉलर रोनाल्डोच्या दोन शब्दांनी कोका-कोलाला झटका! कंपनीला तब्बल 30 हजार कोटींचा फटका

क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 वेळा बॅलन डिओर अॅवॉर्ड जिंकले आहेत. पोर्तुगालच्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा तो खेळाडू आहे. रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताही टॅटू गोंदवला नाही. तो वर्षातून अनेकवेळा रक्तदान करतो. त्यामुळे त्याने ही खबरदारी घेतलीय. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 102 गोल केले आहेत. तसेच आतापर्यंत 9 वेळा हॅट्रिक केली आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंमध्ये त्याचं नाव आहे. 

EURO CUP 2020: क्रिस्टियानो रोनाल्डोनं रचला इतिहास, स्पर्धेत खास विक्रमांची नोंद

पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोनाल्डोने पाचही वेळेस म्हणजेच 2004, 2008, 2012 आणि 2016, 2021 च्या युरो कपमध्ये गोल झळकावले आहेत. पोर्तुगालच्या वतीनं सर्वाधिक 106 गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. युरो कपमध्ये सर्वाधिक वय असतानाही एका सामन्यात 2 हून अधिक गोल करण्याचा मान त्यानं मिळवला आहे.  रोनाल्डोनं सर्वाधिक 5 युरो कप खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Embed widget