एक्स्प्लोर

Cricketer's Passed Away : सरत्या वर्षात क्रिकेट जगतातील 'या' 5 दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप!

Cricketer's Passed Away : 2023 च्या विश्वचषकात अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, सरत्या वर्षात क्रिकेट जगतातील 5 दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये भारताचे माजी कर्णधाराचाही समावेश आहे.

Cricketer's Passed Away in 2023 : 2023 च्या विश्वचषकात अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, सरत्या वर्षात क्रिकेट जगतातील 5 दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये भारताचे माजी कर्णधाराचाही समावेश आहे. क्रिकेटपटूबाबतच्या अनेक आठवणी चाहते शेअर करताना दिसत आहेत. क्रिकेटपटूंशी काहीअंशी कनेक्ट असलेल्या, सातत्याने खेळाडूंना पाहिलेल्या अनेकांवर एकप्रकारे दु:खाचा डोंगरचं कोसळला आहे.

भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी 77 वर्षी घेतला जगाचा निरोप

भारताचे माजी कर्णधार आणि फिरकीपटू बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी जगाला अलविदा केला. बिशनसिंग बेदी बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांनी जवळपास 13 वर्ष भारतीय संघासाठी योगदान दिले. 1966 ते 1979 हा त्यांचा कारकिर्दीचा मुख्य कालखंड आहे. बेदी यांनी 67 कसोटी सामने खेळत 266 विकेट्स पटकावल्या आहेत.

सुधीर नाईक यांनी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

सुधीर नाईक (Sudhir Naik)  यांचेही सरत्या वर्षात निधन झाले. त्यांनी 24 मार्चला अखेरचा श्वास घेतला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 85 सामन्यांमध्ये 4376 धावा केल्या. यामध्ये 7 शतकांचाही समावेश आहे. नाईक यांनी 1974-75 पर्यंत भारतासाठी 3 कसोटी सामने तर 2 एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे 141 आणि 38 धावा केल्या. 

झिम्बाब्वेचा दिग्गज अष्टपैलू हीथ स्ट्रीक

झिम्बाब्वेचा दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे 2023 मध्ये निधन झालंय. त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कर्करोगाशी झुंज दिली. हीथ स्ट्रीक हे कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पटकावल्यात. ते झिम्बाब्वे क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. 

 भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतलाय (Salim Durani)

2023 मध्ये भारताच्या आणखी एका माजी क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतलाय. सलीम दुर्रानी असे या माजी क्रिकेटपटूचे नाव आहे. दुर्रानी यांनी वयाच्या 88 व्या वर्षीय जगाचा अलविदा केला. 2 एप्रिलला गुजरातमध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या जन्म काबुलमध्ये झाला होता. त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 170 सामने खेळत 8545 धावा केल्या. यामध्ये 14 शतकांचा समावेश आहे. 

पाकिस्तानच्या एजाज बट यांनी 85 वर्षी अखेरचा श्वास घेतला होता

यष्टीरक्षक एजाज बट यांनी वयाच्या 85 वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. ते यष्टीरक्षक फलंदाज होते. बट यांनी पाकिस्तानकडून 8 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये एजाज यांचेही नाव घेतले जाते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

IND and PAK in WTC Points Table : कसोटीतील दारुण पराभवाने एकाचवेळी भारत आणि पाकिस्तानला झटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget