एक्स्प्लोर

सचिन-धोनीसोबत विश्वविजयी संघात खेळलेला क्रिकेटर सध्या गावात राहतो!

मुंबई: टीम इंडियाच्या विश्वविजयी संघात महत्त्वाची भूमिका बजावलेला मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेलचा आज वाढदिवस. 12 जुलै 1983 रोजी जन्मलेला मुनाफ पटेल 35 व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारताने 2011 साली वन डे विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या ऐतिहासिक संघात मुनाफ पटेलचाही समावेश होता. गुजरातच्या इखार या छोट्या गावात जन्मलेल्या मुनाफ पटेलने एक नामांकित गोलंदाज म्हणून नाव कमावलं. सचिन-धोनीसोबत विश्वविजयी संघात खेळलेला क्रिकेटर सध्या गावात राहतो! खरं तर त्याला क्रिकेटमध्ये रस नव्हता. घरच्या गरिबीमुळे तो लहानपणापासूनच काम करायचा. एका मार्बल फॅक्ट्रीमध्ये तो रोजंदारीला जात असे. त्यासाठी त्याला 35 रुपये मिळत. मुनाफ पटेलचे वडील दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीला जात होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळेच मुनाफ स्वत: काम करत असे.  सचिन-धोनीसोबत विश्वविजयी संघात खेळलेला क्रिकेटर सध्या गावात राहतो! मुनाफ शाळेत होता त्यावेळी तो क्रिकेट खेळायचा. मात्र शास्त्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण परिसरातील वेगवान गोलंदाज म्हणून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मित्रांमुळे क्रिकेटशी जवळीक मुनाफ शाळेत क्रिकेट खेळायचा, शिवाय घरच्या परिस्थितीमुळे तो मोलमजुरीही करायचा. हीच  बाब मुनाफच्या मित्रांनी शिक्षकांना सांगितली. त्यावेळी शिक्षकांनी मुनाफला सांगितलं की, "तुझं पैसे कमावायचं वय होईल, तेव्हा पैसे कमव, पण आता तू खेळावर लक्ष दे".  मित्राची मदत काही वर्षांनी मुनाफची युसूफ नावाच्या मित्राशी ओळख झाली. युसूफच मुनाफला क्रिकेट खेळण्यासाठी बडोद्याला घेऊन आला. मुनाफ आधी चप्पल घालून क्रिकेट खेळायचा. मात्र युसूफनेच त्याला बूट खरेदी करुन दिले, त्याचं क्रिकेट क्लबमध्ये अॅडमिशनही केलं. सचिन-धोनीसोबत विश्वविजयी संघात खेळलेला क्रिकेटर सध्या गावात राहतो! संपूर्ण गावाला मुनाफची मदत सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत 2011 च्या विश्वचषकात खेळलेला मुनाफ पटेल आजही त्याच्या गावात राहतो. क्रिकेटमुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे, गाववाल्यांच्या मदतीला तो धावून जातो. सचिन-धोनीसोबत विश्वविजयी संघात खेळलेला क्रिकेटर सध्या गावात राहतो! गावातील प्रत्येकजण आर्थिक मदतीसाठी मुनाफकडे जातो. याबाबत मुनाफ म्हणतो, "जर कोणी मदतीसाठी आला आणि मी त्याला प्रश्न विचारला, तर माझे वडील म्हणतात, तुझ्या प्रश्नांनी त्याचं पोट भरणार नाही, त्याला मदत हवी आहे ती मदत कर" मुनाफच्या क्रिकेटवर वडिलांची नाराजी मुनाफ पटेलचं क्रिकेट खेळणं वडिलांना पसंद नव्हतं. मुनाफने आफ्रिकेला जाऊन पैसे कमवावे अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या इखार गावचे अनेक तरुण काम आणि पैसे कमवण्यासाठी आफ्रिकेला जात होते. शिवाय मुनाफचे काही नातेवाईकही कामानिमित्त आफ्रिकेत होते, त्यामुळेच त्याने तिकडे जावं अशी वडिलांची इच्छा होती.  मराठमोळ्या क्रिकेटपटूंची मदत माजी क्रिकेटर किरण मोरे यांनी 2003 मध्ये मुनाफच्या प्रशिक्षणादरम्यान त्याची गोलंदाजी पाहिली. त्यांनी तातडीने त्याला चेन्नईला प्रशिक्षणासाठी पाठवलं. चेन्नईत दिग्गजांसोबत त्याला प्रशिक्षण घेता आलं. डेनिस लिली आणि स्टीव वॉसारख्या खेळाडूंनी त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. सचिन-धोनीसोबत विश्वविजयी संघात खेळलेला क्रिकेटर सध्या गावात राहतो! त्यानंतर मुनाफवर सचिन तेंडुलकरच्या नजरेत आला. सचिनने त्याला मुंबईच्या रणजी संघात स्थान दिलं. त्यावेळी मुनाफला बडोदा संघात स्थान मिळालं नव्हतं. तर अजित आगरकरची भारतीय संघात निवड झाल्याने, मुंबईला एका मध्यमगती गोलंदाजाची गरज होती. त्याचवेळी मुनाफला मुंबईच्या संघात स्थान मिळालं. दुखापतीमुळे करिअर धोक्यात मुनाफ पटेल 2006 ते 2011 पर्यंत भारतीय संघात होता. विश्वचषक जिंकल्यानंतर दुखापतीमुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थानच मिळालं नाही. मुनाफ भारताकडून 2007 आणि 2011 च्या विश्वचषकात खेळला आहे. सध्या तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni And Rishabh Pant Video: जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
BCCI : आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब, BCCI अॅक्शन मोडमध्ये, आज होणार मोठा निर्णय?
BCCI : आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब, BCCI अॅक्शन मोडमध्ये, आज होणार मोठा निर्णय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Embed widget