एक्स्प्लोर

MS Dhoni And Rishabh Pant Video: जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?

MS Dhoni And Rishabh Pant Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांचा एक व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

MS Dhoni And Rishabh Pant Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. क्रिकेटपासून दूर असतानाही दोन्ही खेळाडूंमधील मैत्री आणि बॉन्डिंग पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेपूर्वी ऋषभ पंत मार्गदर्शन घेण्यासाठी धोनीच्या रांची शहरात पोहोचला होता. यावेळी धोनीच्या मार्गदर्शनाखाली पंतने नेट बॉलर्सविरुद्ध सरावही केल्याचे समोर आले होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय? (MS Dhoni And Rishabh Pant Video)

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एमएस धोनी आणि ऋषभ पंत आपल्या मित्रांसोबत पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. पंत सोफ्यावर बसलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीजवळून धोनीला ‘माही भाई’ म्हणत ग्रुप फोटोसाठी बोलावताना दिसतो. त्यानंतर धोनी त्यांच्याकडे येतो आणि पंतला हसत ‘जरा हुक्का पिऊन येतो’ असं बोलतो. पंत आणि धोनी यांच्यातील हा अनौपचारिक संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमध्ये पंत आणि धोनी नेमकं काय म्हणाले? (MS Dhoni And Rishabh Pant Video)

एमएस धोनी आणि ऋषभ पंत यांचा समावेश असलेल्या मुलांच्या हाऊस पार्टीतील कथित व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये धोनी मी हुक्का प्यायला जाऊन येतो, असे म्हणताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर ऋषभ पंत मीही येतो, असे उत्तर देताना ऐकू येतात. या दोन्ही क्रिकेटपटूंमधील कथित संभाषणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. चाहते या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. दरम्यान, काही सोशल मीडिया युजर्सनी दोन्ही खेळाडूंच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. तंबाखूचा धूर आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सर्वश्रुत असताना, व्यावसायिक क्रिकेटपटू कथितपणे हुक्का किंवा धूम्रपान करताना दिसणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या व्हायरल क्लिपमुळे व्यावसायिक खेळाडूंची फिटनेस, आरोग्य आणि जीवनशैली यावरही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

श्रीलंका कसोटी मालिकेत पंतची शानदार कामगिरी- (Rishabh Pant Ind vs SL)

श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1-0 अशी मालिका जिंकली. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने विजय मिळवला, तर कोलंबोमध्ये झालेली दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. या मालिकेत ऋषभ पंतने 3 डावांमध्ये 56 च्या सरासरीने 168 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. भारतीय संघाच्या विजयात पंतची भूमिका महत्त्वाची ठरली.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत मैदानात उतरणार? (Ind vs NZ)

श्रीलंका दौऱ्यानंतर ऋषभ पंतने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबत अनिवार्य फिटनेस टेस्ट पूर्ण केली आहे. आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. संजू सॅमसन आणि ईशान किशन यांची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. 2027च्या वनडे विश्वचषकाचा विचार करता, वनडे संघात केएल राहुल आणि ईशान किशन यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याने आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतही पंतला संधी मिळणे कठीण दिसत आहे. त्यामुळे ऋषभ पंतची मैदानावरील पुनरागमन 19 नोव्हेंबरपासून वेलिंग्टन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेत होण्याची शक्यता आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधिता बातमी:

IND vs AFG T20 Series Team India Squad Against Afghanistan: हार्दिक पांड्या OUT, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांचा मुलगा 28 षटकार मारु शकत नाही, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची खदखद, वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह 
वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकाचे पाकिस्तानला हादरे, माजी क्रिकेटपटूनं थेट बेबी बॉसच्या वयाचा मुद्दा काढला
Shoaib Akhtar On Vaibhav Sooryavanshi: बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
Vaibhav Sooryavanshi: आता तू माझी प्रेरणा..., वैभव सूर्यवंशीच्या 204 धावांच्या खेळीवर सूर्या खूश, सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सूर्यादादा खूश, सूर्यानं वैभवलाच प्रेरणास्थान बनवलं...
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Embed widget