एक्स्प्लोर

महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक

Pune News: शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य राजेंद्र काशीराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे

MNS agitation in Pune: पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन (Government Polytechnic) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र भिंतीवरून काढल्याच्या घटनेप्रकरणी, महाराष्ट्र नवनिर्मित विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांची नावे प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारी आणि हर्षद गोडसे अशी आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक अटक करण्यात आली आहे. मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 

चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला

शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य राजेंद्र काशीराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये अमित ठाकरे यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या 20-25 अज्ञात पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचाही उल्लेख आहे. एफआयआरनुसार, ठाकरे आणि त्यांचा गट सोमवारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयात आले होते. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, मेस आणि शौचालयांमधील स्वच्छतेबाबत महाविद्यालयीन प्रशासनाला जाब विचारला आणि मोठ्या आवाजात सूचना दिल्या, असा आरोप पाटील यांनी केला.

नरेंद्र मोदींचे छायाचित्र काढण्यास सांगण्यात आले

तक्रारदाराचा आरोप आहे की, ठाकरे यांच्यासोबत आलेल्या अज्ञात कार्यकर्त्यांपैकी एकाला कार्यालयाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र काढण्यास सांगण्यात आले. पाटील यांनी याला विरोध केला असता, त्या कार्यकर्त्यांने ते छायाचित्र "बळजबरीने" काढले. तसेच, हा गट विनाकारण कार्यालयात थांबून राहिला आणि त्यांनी "मनसे जिंदाबाद" व "महाराष्ट्र नवनिर्मित विद्यार्थी सेना विजय असो" अशा घोषणा देऊन गोंधळ घातला, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.पाटील यांनी आरोप केला की, त्यांना आणि कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर शिक्षक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. एफआयआरनुसार, त्यांना सांगण्यात आले की जर गटाने दिलेल्या सूचनांचे आठ दिवसांत पालन केले नाही, तर ते पुन्हा कार्यालयात येऊन आंदोलन करतील.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Sanjay Raut: विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले, अन् नरेंद्र मोदी खिदीखिदी हसतात; MPSC वरून संजय राऊत संतापले, म्हणाले, 'दिमागी नक्षल...'
विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले, अन् नरेंद्र मोदी खिदीखिदी हसतात; MPSC वरून संजय राऊत संतापले, म्हणाले, 'दिमागी नक्षल...'
Manoj Jarange Patil health: मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, 7 किलो वजन घटलं, शुगर लेव्हल ड्रॉप; मध्यरात्री उदय सामंतांचा फोन
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, 7 किलो वजन घटलं, शुगर लेव्हल ड्रॉप; मध्यरात्री उदय सामंतांचा फोन
Advertisement

व्हिडीओ

Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Embed widget