Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. अतिरिक्त विभागीय आयुक्त मंजुषा मिसकर, जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी जरांगेंसमोर सरकारचा मसुदा मांडला. मात्र, जरांगेंनी अधिकाऱ्यांच्या पातळीवरील चर्चा फेटाळून लावली. सर्व मागण्या राज्यस्तरीय आहेत. तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात. तुम्हाला उगाच सरकार बकरा करत आहे. पुन्हा येऊ नका, हा तुमच्या स्तरावरील विषय नसून राज्य स्तरावरील विषय आहे, असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारच्या मसुद्यावर नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे.




















