एक्स्प्लोर
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां लवकरच बॉलिवूडमध्ये!
हसीन जहांने क्रिकेटर मोहम्मद शमीवर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारासह अनेक आरोप केले आहेत.
मुंबई : क्रिकेटर मोहम्मद शमीपासून वेगळं झाल्यानंतर त्याची पत्नी हसीन जहां मुंबईत मॉडेलिंग करत आहे. लवकरच ती दिग्दर्शक अमजद खानच्या 'फतवा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. 'फतवा'मध्ये हसीन पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. हसीन म्हणाली की, "मला माझ्यासाठी आणि मुलीसाठी काम करण्याची गरज होती. त्यामुळे मी अमजद खानला संपर्क केला आणि ते तयार झाले. मला कायदेशीर लढाई लढण्यासाठीही पैशांची आवश्यकता आहे."
हसीन जहांने क्रिकेटर मोहम्मद शमीवर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारासह अनेक आरोप केले आहेत. हसीनने चार महिन्यांपूर्वी शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. शिवाय शमीने दर महिना दहा लाख रुपये भत्ता द्यावा, अशी मागणीही हसीनने कोर्टात केली होती. हसीनने मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. पण बीसीसीआयने त्याला क्लीन चिट दिली होती.
हसीन प्रोफेशनल मॉडेल होती आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट राइडर्स संघाची चीअर लीडरही होती. पण 2014 मध्ये शमीसोबत लग्न केल्यानंतर तिने मॉडेलिंग सोडली. तर शमीला आपलं मॉडेलिंग आवडत नव्हतं. त्यामुळे मॉडेलिंग सोडल्याचा दावा हसीन जहांने केला होता. आता शमीपासून वेगळं झाल्यानंतर ती पुन्हा एकदा मॉडेलिंगद्वारे लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
Hasin jahan I m pic.twitter.com/mXumuTAJRs
— Hasin Jahan (@HasinJahan4) July 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement