T20 World Cup 2026 Squad : टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आणखी एका संघाची घोषणा, अचानक स्टार अष्टपैलूकडे सोपवलं कर्णधारपद; सगळेच चक्रावलं, पाहा Squad
Zimbabwe Squad for T20 World Cup 2026 Marathi News : टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी झिम्बाब्वे क्रिकेट संघाने आपला अंतिम संघ जाहीर केला.

Zimbabwe Squad for T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी झिम्बाब्वे क्रिकेट संघाने आपला अंतिम संघ जाहीर केला असून, या स्पर्धेत संघाची धुरा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा याच्याकडे सोपवण्यात आली आहे. मागील हंगामात झिम्बाब्वेला पात्रता फेरीत अपयश आले होते, मात्र अलीकडच्या काळात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिकंदर रजाच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करत थेट वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळवला आहे.
ब्रायन बेनेटवर फलंदाजीची मोठी जबाबदारी
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी झिम्बाब्वेच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे एकहाती सामन्याचा निकाल बदलू शकतात. त्यात ब्रायन बेनेट, ब्लेसिंग मुजरबानी आणि रिचर्ड नगारवा यांचा समावेश आहे. बेनेट हा संघाच्या फलंदाजी क्रमातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, आगामी स्पर्धेत त्याची फॉर्म निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे, मुजरबानी आणि नगारवा आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची क्षमता ठेवतात. संघात अनुभवी ग्रीम क्रेमर देखील असल्याने गोलंदाजी आक्रमणाला बळ मिळाले आहे.
सिकंदर रजा आणि ब्रेंडन टेलरवर संघाची भिस्त
या संघात अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलर याचीही निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा अनुभव मोठा असून, त्याने यापूर्वी अनेकदा आपल्या जोरावर जिम्बाब्वेला विजय मिळवून दिला आहे. टेलरची टी20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाली असून, त्याने आतापर्यंत 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1185 धावा केल्या आहेत. यात एका शतकासह सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच, टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये झिम्बाब्वेची कामगिरी मोठ्या प्रमाणात कर्णधार सिकंदर रजा यांच्या खेळावर अवलंबून असेल. फलंदाजीसोबतच गोलंदाजी आणि नेतृत्वात तो संघासाठी कळीचा खेळाडू ठरणार आहे.
ग्रुप-बी मध्ये झिम्बाब्वेचा सामना कठीण
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी झिम्बाब्वेला ग्रुप-बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान हे संघ आहेत. आजवर झिम्बाब्वेने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केलेला नाही. त्यामुळे यंदा संघाकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असेल.
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी झिम्बाब्वेचा संघ (Zimbabwe Squad for T20 World Cup 2026) :
सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रॅमी क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह माडेंडे, टिनोटेंडा माफोसा, तदिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, आशीर्वाद मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, ब्रेंडन टेलर.
हे ही वाचा -




















